तरुण भारत

पुलवामात CRPF च्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला; जवान जखमी

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास CRPF च्या तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 180 बीएन तुकडीवर ग्रेनेड फेकले. त्यात सीआरपीएफचे एएसआय असीम अली जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. 

दरम्यान, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख लष्कर-ए-तोयबाचा आयईडी तज्ज्ञ नासिर शकील साब शक भाई अशी करण्यात आली होती. 

Related Stories

दिल्ली : गेल्या 24 तासात 1299 नवे कोरोना रुग्ण; 15 मृत्यू

pradnya p

खुशखबर ! लॉक डाऊनमध्ये गॅस सिलेंडर झाला स्वस्त

pradnya p

पाकिस्तानची आगळीक खपवून घेणार नाही!

Patil_p

राज्यात दोन दिवसात कोरोनाचे 80 रुग्ण

Patil_p

‘लॉकडाऊन’संदर्भात मोदी-शहांमध्ये चर्चा

Patil_p

आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार योजनेचा प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!