तरुण भारत

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 4 कोटींचा टप्पा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा गाठला आहे. जगात आतापर्यंत 4 कोटी 23 हजार 135 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 11 लाख 15 हजार 599 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

शनिवारी जगभरात 3 लाख 72 हजार 552 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 4 कोटी बाधितांपैकी 2 कोटी 99 लाख 34 हजार 930 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 89 लाख 72 हजार 606 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 72 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 83 लाख 43 हजार 140 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 54 लाख 32 हजार 452 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 24 हजार 283 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 74 लाख 94 हजार 551 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 65 लाख 97 हजार 209 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 14 हजार 064 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

मार्क्‍सवादी क्रांतिकारक चे गवेरा यांचे घर विक्रीसाठी खुले

datta jadhav

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

prashant_c

न्यूझीलंडमध्ये शनिवारी सार्वत्रिक निवडणूक

omkar B

डिस्नेलँड खुले

Patil_p

पार्टीतील गोळीबारात न्यूयॉर्कमध्ये 2 ठार

Patil_p

अद्याप नाही ‘समूह प्रतिकारशक्ती’

Patil_p
error: Content is protected !!