तरुण भारत

ब्रह्मोस सूपरसोनिक मिसाईलची यशस्वी चाचणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

चेन्नईतील स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएसमधून अरबी समुद्रातील एका लक्ष्याला निशाणा बनवत ब्रह्मोस सूपरसोनिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

डीआरडीओच्या माहितीनुसार, दूरवरचे लक्ष्य साधणाऱ्या ब्रह्मोस सूपरसोनिक मिसाईलची आज सकाळी भारतीय नौदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईतून यशस्वी चाचणी घेण्यात आली. 400 किलोमीटर मारक क्षमता असलेले हे मिसाईल अरबी समुद्रातील लक्ष्याला पीन-पॉईंट ॲक्युरेसीने धडकले.

हे मिसाईल डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएमने संयुक्तरित्या बनवले आहे. हे जगातील सर्वात वेगवान मिसाईल आहे. पाणडुबी, जमीन, लढाऊ विमानातून हे मिसाईल डागले जाऊ शकते. 11 मार्च 2017 मध्ये चांदीपूर स्थित आईटीआरपासून ब्रह्मोसचे जमीनीवरील पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. 

Related Stories

नागरिकत्व कायदा विरोधक दलितविरोधी

Patil_p

मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

prashant_c

स्वदेशी ‘रुद्रम’चा यशस्वी लक्ष्यभेद

Patil_p

भोपाळमध्ये आयएएस अधिकाऱयाला लागण

Patil_p

7 महिन्यांनी झायरा वसीम सक्रीय

Patil_p

कोरोना रुग्णसंख्येत भारत तिसऱया स्थानी

Patil_p
error: Content is protected !!