तरुण भारत

आयएमए कंपनीच्या संस्थापकांसह २८ जणांविरूद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आयएमए घोटाळ्यातील कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह २८ आरोपींविरूद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये प्रशासन आणि अनेक उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

सीबीआयने महसूल विभागाच्या बेंगळूर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त, पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे विभाग, सीआयडी, पोलीस उपायुक्त, बेंगळूर पूर्व विभाग विभाग, कमर्शिअल स्ट्रीट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि आयएमए कंपनीचे संबंध किंवा व्यवसाय भागीदारी यांच्या विरोधात प्राथमिक आरोपपत्र दाखल केले.

आरोपींना वाचविण्यासाठी चुकीचा अहवाल
या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मन्सूर खान याच्याविरोधात कित्येक लोकांकडून तक्रारी आल्यानंतर महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. परंतु आरोपींना वाचविण्यासाठी त्यांनी चुकीचा अहवाल सरकारला दिला. अनेक गंभीर आरोप असूनही, आरोपीला अटक केली गेली नाही आणि कोणतीही कारवाई केली गेली नाही. सीबीआयने आयएमए कंपनीविरूद्ध चार गुन्हे दाखल केले आहेत.

Related Stories

म्हैसूर दसरोत्सवाचे कार्यक्रम ऑनलाईनच पहा

Patil_p

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री कारजोळ कोरोनाबाधित

Shankar_P

कर्नाटक: डी.के.शिवकुमार पुन्हा होम क्वारंटाइन

Shankar_P

शहरी स्थानिक संस्था आणि ग्रामीण पंचायतींचा सर्व मालमत्ता कर माफ कराः डी.के.शिवकुमार

triratna

म्हैसूरमध्ये हस्तिदंत तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक

Shankar_P

कर्नाटक: बेंगळूरहून सोलापूरला उद्या पहिली रोरो ट्रेन रवाना होणार

triratna
error: Content is protected !!