तरुण भारत

सांगली : बागणीतील कोविड सेंटर सामान्य लोकांच्या फायद्याचे : पालकमंत्री

वार्ताहर/बागणी

बागणीत आज नव्याने कोविड १९ सेंटरचा लोकार्पण समारंभ पार पडला हे कोविड सेंटर सामान्य लोकांना दिलासा देणारे व चांगली सुविधा देणारे आहे. लोकांनी आता आजार अंगावर न काढता वेळेवर उपचार सुरू करून घ्यावेत त्यामुळे लवकर बरे होऊन हानी होणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते कोविड १९ सेंटरचा लोकार्पण समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, कारखाना संचालक लक्ष्मणराव माळी, शिगावचे माजी सरपंच उदयसिंह पाटील, सरपंच संतोष घनवट, प्रमोद माने, उपसरपंच विष्णू किरतसिंग, सुभाष हवलदार, सतीश काईत, अल्लाउद्दीन चौगले, सतीश शेटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, बागणी व परिसरातील लोकांना ह्या कोविड सेंटरचा मोठा फायदा होणार आहे. खासगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात खर्च होत आहेत त्याला आता टाच बसणार आहे. लोकांना हे सेंटर मोफत आहे कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. जगात पहिली लाट येऊन गेली आहे. आता दुसरी लाट येईल पण भीती नको काळजी घेणे आवश्यक आहे. अंगावर आजार काढू नका वेळेवर तपासणी व उपचार करून घेणे गरजेचे आहे. गेली अनेक दिवस माझ्या सतत पाठीमागे लागून उदयसिंह पाटील यांनी या कोविड सेंटरचा पाठ पुरावा केला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना चांगली राबवा असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याला आता धोका कमी आहे. ह्या ठिकाणी हे कोविड सेंटर उभे राहिले आहे ते मंत्री पाटील यांनी तात्काळ मंजूर करून लोकांना मोफत चांगल्या सोईनियुक्त तयार आहे. या महामारीत पालकमंत्र्यांनी चांगले काम केले आहे. उदयसिंह पाटील यांनी सेंटर उभारणीसाठी पाठपुरावा केला आहे. याचा फायदा लोकांनी घ्यावा अंगावर आजार काढू नका असे आवाहन केले.

उदयसिंह पाटील म्हणाले साहेब तुमि कोविड रुग्ण कमी होण्यास मोठे कष्ट घेत आहात पण आम्हां कार्यकर्ते याना देखील काम करण्यास संधी द्या आणि बागणी येथे कोविड सेंटर परिसरातील लोकांना याचा फायदा होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे सेंटर फायद्याचे होणार आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी भगवानराव पाटील, अरुण साखरे, डी आर पाटील, नामदेव पाटील, महादेव पाटील, इम्रान शिकलगार, संतोष शेळके, विकास अब्दागिरे, राजेंद्र पवार, आखतर शिकलगार, विठ्ठल पाटील, मेघाईत पाटील, किसन मलप, उमेश पाटील, विनायक दाभोळे, अल्लाउद्दीन चौगले, शहानवाज सुतार, जावेद चौगले, किरण जगताप, नंदकुमार खोत, दिलीप चौगले, धनाजी गोसावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही : जिल्हाधिकारी

triratna

सांगली : आटपाडीत ५० वर्षावरील नागरिकांचे घेतले स्वॅब

triratna

सांगली : ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

triratna

मणेराजुरीनजीक अपघातात एक ठार

triratna

सांगली : ताकारीत कोरोनाचा शिरकाव

Shankar_P

सांगली: बागणी, काकाचीवाडी येथील रेशनिंग दुकानावर कारवाई

triratna
error: Content is protected !!