तरुण भारत

आलमट्टीतील उद्यान आजपासून खुले

वार्ताहर/ जमखंडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलमट्टी येथील बंद करण्यात आलेले उद्यान सात महिन्यांनंतर 19 ऑक्टोबरपासून खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती आलमट्टी धरण विभागीय अभियंते एच. सुरेश यांनी दिली. शासनाच्या मार्गसूचीप्रमाणे उद्यान उघडण्यास जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली आहे.

Advertisements

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यादृष्टीने 14 मार्चपासून उद्यान बंद करण्यात आले होते. मात्र 19 पासून संगीत कारंजा, लेझर प्रदर्शन, रॉक उद्यान, लव-कुश उद्यान, मोघल, इटालियन, प्रेंच उद्याने उघडण्यात येणार आहे. पर्यटकांना मास्कचा वापर बंधनकारक असून सामाजिक अंतराचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. 77 एकर परिसरात उद्यान असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संगीत नृत्य कारंजा, एक एकरमध्ये मुलांसाठी विज्ञान पार्क व थ्रीडी प्रवेशद्वार निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

टेम्पो-लक्झरी बस अपघातात एक गंभीर

Omkar B

शिवसेना खासदार हेमंत गोडसे 25 रोजी बेळगावमध्ये

Patil_p

मास्टर्स राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या तीन जलतरणपटूंचे यश

Amit Kulkarni

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी तीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Rohan_P

शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनाही कोरोनाचा दणका

Amit Kulkarni

युवकांकडून देवदेवतांच्या फोटोंचे संकलन

Omkar B
error: Content is protected !!