तरुण भारत

कॅसलरॉक-दूधसागरदरम्यान घातले काँक्रिट स्लिपर्स

प्रतिनिधी/ बेळगाव

दरवषी ट्रकसाठी वापरण्यात येणारे काँक्रीटचे स्लिपर्स खराब झाल्यानंतर काढून टाकण्यात येतात. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेने या खराब स्लिपर्सचा अनोख्या पद्धतीने पुनर्वापर केला आहे. कॅसलरॉक ते दूधसागर या रेल्वे घाटमार्गावर ट्रक शेजारी स्लिपर्स घालण्यात आले आहेत. यामुळे रेल्वेमार्गाची तपासणी करणाऱया कर्मचाऱयांना सोयीचे ठरत आहे.

Advertisements

ट्रकच्या देखभालीसाठी गँगमन, ट्रक तपासणीस व की मॅन यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या असतात. रात्रीच्या वेळी ट्रकची तपासणी करताना कर्मचाऱयांना ट्रकवरूनच चालावे लागते. यासाठी खराब झालेले काँक्रीटचे स्लिपर्स ट्रकच्या शेजारून घालण्यात आले आहेत. दहा हजारहून अधिक स्लिपर्स वापरून 12 कि. मी.चा समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे. याच बरोबर घाटमाथ्यावर दरड कोसळणे, रेल्वेमार्ग कोसळणे असे प्रकार वारंवार होत असल्याने ट्रकच्या शेजारील स्लिपर्स लावण्यात आल्याने धोका कमी प्रमाणात होत आहे.

या अनोख्या उपक्रमाबद्दल नैर्त्रुत्य रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. सिंग यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. मुख्य अभियंता विपुलकुमार, नीरज बाफना, अरविंद मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नैर्त्रुत्य विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. 

Related Stories

भू-संपादनविरोधात अनगोळ शेतकऱयांचा वैयक्तिक आक्षेप

Patil_p

13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

कोजागरी पौर्णिमेदिवशी तालुका अंधारात

Amit Kulkarni

जिल्हय़ातील आणखी नऊ जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

डॉक्टरांचे आंदोलन मागे, कोरोना रुग्णांची नोंद सुरु

Patil_p

श्रेष्ठा फौंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!