तरुण भारत

जांबोटी येथे दूर्गामाता दौडीला प्रारंभ

जांबोटी /  वार्ताहर

सालाबादप्रमाणे जांबोटी-रामापूरपेठ येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान शाखेच्यावतीने शनिवारपासून श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ करण्यात आला आाहे. चालूवर्षी कोरोना महामारीच्या साथीमुळे ही दौड साधेपणात सुरु असून नियमांचे काटोकोरपणे पालन करुन मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये दौडीला प्रारंभ करण्यात येत आहे.

Advertisements

जांबोटी बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करुन दौडीला सुरवात होत आहे. शनिवार पहाटे दुर्गामाता दौडीचे अध्यक्ष मनोहर गोवेकर, संजय गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. तसेच दौडीचे उपाध्यक्ष राम डांगे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. मंजुनाथ मुतगी, उमेश हळदणकर यांच्या हसते शस्त्र पूजन करण्यात आले. त्यानंतर मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये दौडीला प्रारंभ करण्यात आला. ही दौड शिवपुतळय़ापासून प्रारंभ होऊन अयोध्यानगर, पारवाडकर गल्ली, राम मंदिर पंचाची खुट्टी येथे फिरुन बसस्टँडवरील शिवस्मारक चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व पुष्पअर्पण करुन व प्रेरणा मंत्राने या दौडीची सांगता करण्यात आली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळकृष्ण पेडणेकर, राजू गावडे, राजू कुर्लेकर, सचिन कुडतूरकर, मिथून कुंभार, मदन कणगुटकर तसेच गावातील मोजकेच लोक सहभागी झाले होते. शिवभक्तानी दौडीत सामाजिक अंतर तसेच मास्कचा वापर केला होता.

Related Stories

कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांची रीघ

Patil_p

कचरावाहू वाहन ताफ्यात ई-ऑटोटिप्पर दाखल

Omkar B

लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Amit Kulkarni

दहावीचा निकाल उद्या

Patil_p

महापूर येताच महापालिकेला आली जाग

Patil_p

कर्ज देताना चांगले कर्जदार बघून कर्ज द्या!

Patil_p
error: Content is protected !!