तरुण भारत

दौड साधेपणाने पण उत्साह मात्र अमाप

प्रतिनिधी/ बेळगाव

यावषी प्रशासनाच्या नियमावलीनुसार दुर्गामाता दौड साधेपणाने काढण्यात येत असली तरी उत्साह मात्र तोच पहायला मिळत आहे. जरी सहा धारकरी दौडच्या मार्गावर धावत असले तरी हजारो शिवभक्तांचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे दरवषीच्या दौडची खंत कुठेही जाणवताना दिसत नाही. ज्या हिंदू बांधवांना दौडमध्ये सहभागी होता आले नाही ते घरोघरी शिवचरीत्राचे पारायण करीत आहेत. दौडच्या दुसऱया दिवशीही धारकऱयांची संख्या जरी कमी असली तरी उत्साह मात्र हजारोंच्या संख्येचा होता.

Advertisements

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने काढण्यात येणाऱया दुर्गामाता दौडच्या दुसऱया दिवशीची सुरुवात चन्नम्मा चौक येथील गणपती मंदिरापासून झाली. मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवयोगी संगमेश यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढविण्यात आला. प्रेरणा मंत्राने दौडची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भवानी माता व दुर्गा मातेच्या नावाचा जागर दौडच्या मार्गावर करण्यात येत होता.

संगोळ्ळी रायण्णा रोड मार्गे आरटीओ सर्कल, अशोक सर्कल येथून किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात दुसऱया दिवशीच्या दौडची सांगता झाली. दुर्गादेवी मंदिराच्या पुजाऱयांनी दौडचे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. दुर्गादेवीची आरती व ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली. मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवयोगी संगमेश यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.

दौडचा खर्च सुवर्ण सिंहासनासाठी द्यावा : विश्वनाथ पाटील (शहर कार्यवाहक-शिवप्रतिष्ठान)

प्रतिवर्षी दुर्गामाता दौड केव्हा होणार याची उत्सुकता प्रत्येक हिंदू बांधवाला असते. परंतु या वषी कोरोनामुळे बरेच निर्बंध आले आहेत. जरी साधेपणाने दौड काढण्यात येत असली तरी उत्साह मात्र तोच आहे. यावषी दौडसाठीचा खर्च सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी म्हणून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

परिस्थितीला तोंड देत परंपरा अखंडित : प्रदीप जुवेकर (धारकरी-ताशिलदार गल्ली)

आलेल्या परिस्थितीला तोंड देत परंपरा खंडित होणार नाही या उद्देशाने यावषीही साधेपणाने का होईना दौड काढण्यात येत आहे. दरवषी हजारोंच्या संख्येने शिवभक्त या दौडमध्ये सहभागी होत असले तरी यावर्षी आम्ही सहाजण शिवप्रेमींचे नेतृत्व करत दौड पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जगदंबे कोरोना महामारीचे संकट दूर कर : यल्लेश मरूचे (धारकरी-कल्लेहोळ)

20 ते 25 हजार शिवप्रेमी दरवषी दौडमध्ये सहभागी होतात. परंतु यावषी काहीच जण सहभागी होत असल्याने थोडी उणीवही भासत आहे. शिवरायांचा तो जयघोष कानावर पडत नसल्याने वाईटही वाटत आहे. परंतु आई जगदंबेसमोर हे कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवार दि. 20 रोजीचा दौडचा मार्ग

टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. यानंतर पहिले रेल्वे गेट, देशमुख रोड, आरपीडी चौक, खानापूर रोड, अनगोळ कॉर्नर, हरिमंदिर रोड, धर्मवीर संभाजी चौक, भांदूर गल्ली कॉर्नरमार्गे महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे दौडची सांगता होणार आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांना जुना पास-शुल्क पावती दाखवून करता येणार प्रवास

Amit Kulkarni

सज्जता नाताळ सणासाठीची

Patil_p

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे संत मीरा येथे आयोजन

Amit Kulkarni

धामणे (एस.) गावात टस्कर हत्तीचा धुमाकूळ

Amit Kulkarni

उत्साहपूर्ण वातावरणात दौडची सांगता

Patil_p

स्मार्ट सिटीचे अर्धवट काम चव्हाटय़ावर

Amit Kulkarni
error: Content is protected !!