तरुण भारत

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला 300 भागांचा टप्पा

झी युवावरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण  ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. यातच सई, नचिकेत आणि नचिकेतची थेट ऑस्ट्रेलियावरुन आलेली मैत्रीण पॅडी यांचा प्रेमाचा त्रिकोण बनणार नाही ना असे विचार करता करता प्रेक्षकांची दमछाक होतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने 300 भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

नुकतंच या मालिकेच्या 300व्या भागाचं प्रक्षेपण झालं आणि हा आनंद कलाकारांनी सेटवर साजरा केला. या मालिकेतील अप्पा म्हणजेच अभिनेता सुनील गोडबोले या आनंदाच्या क्षणी म्हणाले, प्रेक्षकांचं अविरत प्रेम आणि पाठिंब्यामुळे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने 300 मालिकांचा यशस्वी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी आजवर या मालिकेला जो प्रतिसाद दिला असाच पुढेही ते राहतील याची मला खात्री आहे.

Related Stories

कलाकारांनी मानले कोविड योद्धय़ांचे आभार

Patil_p

दिल्लीत हे काय करू लागला राजकुमार राव!

Amit Kulkarni

महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुलेंवर येणार मराठी चित्रपट

Patil_p

रहस्यमय घटनांचा वेध ‘द टर्निंग’

Patil_p

नक्षलबारी वेबसीरिज लवकरच प्रदर्शित

Omkar B

…म्हणून अमिताभ बच्चन यांना आंनदाश्रू झाले अनावर

pradnya p
error: Content is protected !!