तरुण भारत

कोरोना लसीकरणासाठी सांगली सज्ज

जानेवारी महिन्यात राबविली जाणार मोहीम
शासनाकडून तयारीची मागविली माहिती
2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागणार लस

विनायक जाधव / सांगली

Advertisements

कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून तयार करण्यात आलेली लस जानेवारी महिन्यात नागरिकांना देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण देशातून आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. या तयारीमध्ये सांगली जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्याची लसीकरणासाठी पूर्ण क्षमतेने तयारी झारी आहे. त्यामुळे ही लस आल्यानंतर जिल्ह्यात ती शासनाच्या आदेशानुसार तातडीने दिली जाणार आहे. ही जिल्ह्याला अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे.

पहिल्या टप्प्यात मोठ्यासंख्येने लस

केंद्रसरकारने जानेवारी महिन्यात ही लस देण्याची तयारी केली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यात कोणाकोणाला लस देण्यात येणार आहे त्याचा प्राधान्यक्रमही जाहीर केला आहे. यामध्ये प्रथम कोविड योध्दे म्हणून काम करणारे आरोग्य कर्मचारी, दोन क्रमांकावर पोलीस, सैन्यदल, मनपा कर्मचारी-अधिकारी, तिसऱ्या क्रमांकावर 50 वर्षावरील देशातील नागरिक आणि चौथ्या क्रमांकावर 50 पेक्षा कमी वय असणारे पण विविध आजाराने त्रस्त असणारे रूग्ण यांना ही लस प्रथम दिली जाणार आहे. त्यानुसार राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांची माहिती एकत्रित करण्यास प्रारंभ केला आहे. या माहितीच्या आधारे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किती लसीचे डोस येणार हे समजणार आहे. पण ही लस आल्यानंतर ती तातडीने देण्यासाठी गावपातळीपर्यंत यंत्रणा मात्र दोन महिने आधीच सुसज्ज करून ठेवण्यात आली आहे.

2018 च्या लसीकरणाचा आरोग्य यंत्रणेला लाभ

जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहीम 2018 साली मोठ्याप्रमाणात राबविण्यात आली होती. ही मोहीम 100 टक्के वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. ही मोहीम अतिशय चांगल्या पध्दतीने जिल्ह्याने राबविली होती. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे राज्यपातळीवर कौतुकही करण्यात आले होते. त्यावेळी लसीकरणासाठी लागणारी सर्व यंत्रणा जिल्हा आरोग्य विभागाने अद्यावत करून घेतली होती. ही यंत्रणा अत्यंत सुस्थितीत आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्यानंतर ती सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि ती देण्यासाठी सर्व यंत्रणा 100 टक्के तयार आहे. फक्त लस येण्याचीच जिल्हा वाट पाहत आहे.

शहरापासून ते गावपातळीपर्यंत यंत्रणा सज्ज

कोरोनाच्या महामारीने कोणालाही सोडले नाही. अगदी खेड्यापर्यंत हा कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे ही लसीकरण मोहीम सर्वांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सक्षम असण्याची गरज आहे. जिल्ह्याने या कालावधीत आता गावपातळीपर्यंत ही आरोग्य यंत्रणा सुसज्ज केली आहे. जिल्ह्यात सध्या 60 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. 15 शहरी आरोग्य केंद्रे, दोन जिल्हा उपरूग्णालये, तीन मोठी खासगी हॉस्पिटल, एक आरोग्य महाविद्यालय, एक जिल्हा रूग्णालय, 14 ग्रामीण रूग्णालये, आणि एक जिल्हा लसीकरण केंद्र अशी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी लस ठेवण्यासाठी लागणारी दोन ते आठ अंश सेल्यिअस तापमान राहिल अशी विविध आकाराचे शीत बॅग तयार आहेत. त्यामुळे ही लस आल्यानंतर ती तातडीने देण्यात येईल. त्यासाठी फक्त लसीच्याच आगमनाची आतुरता आहे.

लसीकरणासाठी यंत्रणा अद्ययावत : डॉ. भूपाल गिरीगोसावी
शासनाकडून जानेवारी महिन्यात लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार शासनाकडून जिल्ह्यातील लसीकरणाबाबत असणारी यंत्रणा, सोयी, सुविधा, त्रुटी याची माहिती घेण्यात आली आहे. जिल्हा लसीकरणासाठी सर्वच बाजूने सुसज्ज आहे. त्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी दिली.

शीतसाखळी उपकरणांची अद्ययावत माहिती
आरोग्य संस्था व्हॅक्सीन कॅरियर कोल्ड बॉक्स
जिल्हा आरोग्य अधिकारी     1850              197
जिल्हा शल्यचिकित्सक       159               16
मनपा आरोग्य अधिकारी       651               38
एकूण                   2660              251

Related Stories

इस्लामपूरच्या २४ बाय ७ पाणीयोजनेचा पाठपुरावा करु : पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

जिल्हय़ात दहा हजार कोरोना रूग्ण बेडवर!

Patil_p

सांगली : मनोज शिंदे म्हैसाळकर यांची जिल्हा ‌नियोजन कमिटीवर सदस्य म्हणून निवड

Abhijeet Shinde

कोरोनात मयत 2 हजार 594 वारसांना 50 हजार सानुग्रह सहाय्य मंजूर – जिल्हाधिकारी

Sumit Tambekar

सांगली : कार्वेच्या तलाठ्यांचे कोरोनामुळे निधन

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!