तरुण भारत

घरडा अभियांत्रिकी’ तील शासकीय कोविड सेंटर अखेर बंद

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याचा परिणाम, ७०० हून अधिक रूग्णांवर झाले उपचार

प्रतिनिधी / खेड

Advertisements

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या वस्तीगृहात शासकीय कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ७०० हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने हे कोविड सेंटर काही कालावधीसाठी रविवारपासून बंद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या थैमानानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर सुरुवातीला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात होते. मात्र, दिवसागणिक वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: मेटाकुटीसच आल्या होत्या. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रूग्णांवर उपचार करताना यंत्रणेवरील ताण वाढून जागेचीही कमतरता भासत होती. पर्यायाने अनेक रूग्णांना उपचारासाठी खासगी कोविड सेंटरचा आधार घ्यावा लागत होता.
यापार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या वस्तीगृहात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली. ५ जूनपासून या शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास प्रारंभ झाला. या काविड सेंटरमध्ये सुरवातीला ६५ बेडस् उपलब्ध होते. दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील कोरीनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने आणखी बेडस् वाढवून ही संख्या १७० वर पोहचली होती. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी सर्व सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

या काविड सेंटरमध्ये ६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ६ आरोग्यसेविका य ६ परिचर कार्यरत होते. कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र राबत होती. हे कोविड सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी एकाप्रकारे वरदानच ठरले होते . गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मंदावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर घरडा येथील काविड सेंटर रविवारपासून काही कालावधीसाठी बंद करण्यात झाले आहे. यापुढे कोरोनाबाधित रुग्णांवर कळंबणी उपजिल्हा रुगणालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत

Related Stories

शिरगाव स्वरुपानंद नगरात विहिरी बनल्या सांडपाण्याने दुषित

Patil_p

लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा राजेश टोपेंचा इशारा

triratna

कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह जळाला नसल्याचा दूरध्वनी आला, अन…

Patil_p

वसंतराव लिमये यांचे निधन

datta jadhav

पुणे विभागातील 3.80 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईनचा निर्णय अंतिम

Patil_p
error: Content is protected !!