तरुण भारत

‘ब्रह्मोस’चे युद्धनौकेवरून यशस्वी प्रक्षेपण

भारताच्या सागरी सामर्थ्यात वाढ, संरक्षण संशोधन संस्थेची भरारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

स्वदेशनिर्मित ब्रह्मोस या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण भारतीय नौदलाच्या ‘चेन्नई’ या युद्धनौकेवरून करण्यात आले आहे. या चाचणीमुळे देशाच्या सागरी सामर्थ्यात वाढ झाली असून चेन्नई ही युद्धनौका या क्षेपणास्त्रामुळे ‘अपराजित’ बनली आहे, असा विश्वास नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. गेली 3 वर्षे या क्षेपणास्त्रनिर्मितीसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) प्रयत्न सुरू होते. ते आता यशस्वी झाले असल्याचे सांगण्यात आले.

भारतीय नौदलाची आयएनएस ही युद्धनौका ‘स्टील्थ’ या प्रकारची, अर्थात शत्रूला थांगपत्ता न लागणारी आहे. या नौकेवरून या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आल्याने या नौकेचे सामर्थ्य कैक पटींनी वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या नव्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता शत्रूच्या युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची आहे.

अरबी समुद्रात चाचणी

या क्षेपणास्त्राचे परीक्षण रविवारी अरबी समुद्रात करण्यात आले. प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर क्षेपणास्त्राने काही मिनिटांमध्येच आपल्या लक्ष्याचा अचूकपणे भेद केला. त्यापूर्वी अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियांमधून या क्षेपणास्त्रला जावे लागले. हे क्षेपणास्त्र भूपातळीवरून भूपातळीवर, भूपातळीवरून आकाशात तसेच आकाशातून आकाशात अशा तिन्ही प्रकारांच्या सामरिक कार्यवाहीसाठी उपयोगात आणण्यात येऊ शकते.

लांब पल्ल्याची क्षमता

या  क्षेपणास्त्राचा पल्ला 200 किलोमीटरचा असून तो 450 किलोमीटरपर्यंत वाढविला जाऊ शकतो. रशियाच्या तांत्रिक साहाय्याने ते भारताने विकसित केले आहे. संगणकीय यंत्रणेद्वारा त्याचे नियंत्रण केले जाते. 300 किलो वजनाची स्फोटके त्यातून वाहून नेली जाऊ शकतात. त्याचा लक्ष्यभेद अत्यंत अचूक आहे. नजीकच्या भविष्यकाळात या क्षेपणास्त्रांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होणार आहे.

ब्रह्मोसची अनेक परीक्षणे

ब्रह्मोस क्षेपणास्त्र ध्वनीच्या तिप्पट वेगाने आपल्या लक्ष्यावर आघात करते. ते युद्धनौका, विमाने, भूमी आणि पाणबुडय़ांवरून डागले जाऊ शकते. बहुउपयोगी शस्त्र प्रकारात ते मोडते. गेल्या वर्षभरात, विशेषतः चीनशी लडाख येथे संघर्ष सुरू झाल्यापासून भारताने या क्षेपणास्त्राच्या विविध प्रकारांच्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत. किरणोत्सर्जन विरोधी रुद्रम क्षेपणास्त्र, सुखोई 30 या विमानावरून डागले जाणारे क्षेपणास्त्र, रणगाडा विरोधी गायडेड क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र डागण्याची क्षमता असणारे ‘शौर्य’ हे क्षेपणास्त्र अशा अनेक प्रकारांचा त्यात समावेश आहे.

Related Stories

लडाखमध्ये ‘टँक रेजिमेंट’ सज्ज

Patil_p

ब्रिटनमध्ये कर्मचाऱयांची मोठी कमतरता

Patil_p

अभिनेता सिद्धार्थचे साहसी पाऊल

Patil_p

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मानले आभार!

Rohan_P

ड्रोन, रोबोट्स, विशेष स्टेथोस्कोपद्वारे लढा

Patil_p

निर्भया : आरोपी पवन अल्पवयीन असल्याची याचिका कोर्टाने फेटाळली

prashant_c
error: Content is protected !!