तरुण भारत

स्वीकृतमध्येच वाढला ट्विस्ट

भाजपच्या निष्ठावंतास मिळणार का संधी?

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा पालिकेत भाजपच्या कोटय़ातल्या स्वीकृत नगरसेवकांची जागा रिक्त झाली आहे.त्याकरिता दि.21रोजी निवड आहे.त्या निवडीकरता एकेकांची चर्चेतली नावे मागे पडत आहेत.एका नगरसेवकाने तर चक्क तीन इच्छुकांची कागदपत्रे पालिकेतून गोळा केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा की जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे स्वीकृतचे नाव जाहीर करणार याची ट्विस्ट लागून राहिली आहे.

भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांचे चांगले काम होते.पालिकेच्या सभागृहात ते बोलत होते.मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला.त्यांच्या रिक्त जागी निवडणूक लागली आहे.दि.21रोजी निवडी होत आहेत.या निवडीच्या अनुषंगाने सुरुवातीला 11 जणांची नावे चर्चेत होती.परंतु पुन्हा या नावाची गळती लागली.सध्या केवळ जयदीप ठुसे, अप्पा कोरे, सुणेशा शहा आणि सुनील कोळेकर या चार जणांच्या नावाची आता चर्चा आहे.यातील तीन जणांची कागदपत्र भाजपच्या एका नगरसेवकाने पालिकेतून गोळा केली आहेत, अशी चर्चा सुरू आहे.पालिकेत सभागृहात भाजपचा ठसा उमठवणारा बोलका स्वीकृत नगरसेवक निवड करणे यामध्ये सध्या ट्विस्ट आहे.जयदीप ठुसे हे भाजपचे जन्मापासूनचे कार्यकर्ते आहेत.तर सुणेशा शहा आणि सुनील काळेकर हे आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळख आहे.त्यांनी अनेक आंदोलन केलेली आहेत.काळेकर हे स्वतःच निवडणूकिला 2016 ला उभे राहणार होते पण आरक्षण महिला लागल्याने प्रभागात त्यांनी त्यांच्या बहिणीला निवडणूकिला उभे केले होते.ते यापूर्वी शहराध्यक्ष ही होते.अप्पा कोरे हे आक्रमक स्वभावाचे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर की प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा हे कोणाचे नाव सुचवणार याकडे ट्विस्ट लागून राहिला आहे.

Related Stories

सातारा : दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

Abhijeet Shinde

‘बर्ड फ्लु’च्या संकटाने व्यावसाईक धास्तावले

Abhijeet Shinde

करवीर तालुक्यात खाजगी सावकारकी व गावठी दारू राजरोसपणे सुरु

Abhijeet Shinde

दहीहंडी साजरी करणारच: संदीप देशपांडे

Abhijeet Shinde

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोखो अन् जेलभरो

Patil_p

सातारा : मुखदर्शनासाठी देवस्थाने खुली करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!