तरुण भारत

वयोवृद्ध महिलेस नगराध्यक्षांचा मायेचा आधार

प्रतिनिधी/ कराड

येथील मंडई परिसरातील प्रकृती बरी नसणाऱया निराधार वयोवृद्ध महिलेला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मायेचा आधार देत तिला रूग्णालयात दाखल केले. तसेच प्रकृतीबाबत काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. नगराध्यक्षांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Advertisements

येथील पेठ गुरुवार मंडई परिसरातील सोमेश्वर मंदिरजवळ एक निराधार वृद्ध महिला गेली 18 ते 20 वर्षे वास्तव्यास होती. याच परिसरातील काही लोक तिला खायला घालत असत. परंतु कोरोना महामारी काळात या वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष झाल्याने या महिलेची प्रकृती बरी नव्हती. गेल्या आठवडय़ात अचानक आलेल्या मोठय़ा पावसाने या महिलेचे आणखी हाल झाले. याबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना या वृद्ध महिलेबाबत माहिती देवून तिच्यासाठी काहीतरी करण्याबाबत विनंती केली. लेखी निवेदनही दिले. या गोष्टीची त्वरित दाखल घेऊन नगरपरिषदेच्या काही कर्मचारी यांना सोबत घेवून सदर महिला ज्या ठिकाणी उघडय़ावर वास्तव्य करत होती, तेथे भेट देऊन त्या आजीची चौकशी केली. त्यांना स्वेटर व अन्य ब्लॅकेट दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व डॉ. शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधून सर्व माहिती दिली. त्यानंतर कराड नगरपरिषदेची रुग्णवाहिका त्वरित बोलावून त्या वृद्ध महिलेस स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्वतः नेऊन दाखल केले. रुग्णालयात जाऊन या महिलेची काळजीपूर्वक औषध उपचार करण्योबाबत डॉक्टरना सूचना दिल्या. नगराध्यक्षांनी त्वरेने दखल घेऊन सदर महिलेच्याबाबत दाखवलेल्या सहानभूती व तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

“खोटारड्या ऊर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”

triratna

जळगावात भीषण अपघातात 15 मजूर जागीच ठार

Rohan_P

जळगाव हादरले! एकाच घरातील चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

Rohan_P

सातारा : वहागाव जवळील कार अपघातातील चौघे मृत युवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील

datta jadhav

शिक्षक बँकेची निवडणूक शिक्षक समिती स्वबळावर लढविणार – उदय शिंदे

triratna

यशवंत डांगे यांची बदली रद्द करा

Patil_p
error: Content is protected !!