तरुण भारत

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांवर

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांवर पोहचली आहे. रशियात आतापर्यंत 14 लाख 15 हजार 316 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 10 लाख 75 हजार 304 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Advertisements

वर्ल्डोमीटरनुसार, रशियात शनिवारी 15 हजार 099 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 185 लजणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रशियात 3 लाख 15 हजार 046 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 24 हजार 366 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 5 कोटी 43 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 83 लाख 88 हजार 013 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात 75 लाख 50 हजार 293 तर ब्राझीलमध्ये ही संख्या 52 लाख 35 हजार 344 एवढी आहे. 

Related Stories

28 तासांमध्ये उभारली 10 मजली इमारत

Patil_p

नोकरदार महिलांना तालिबानने सांगितलं, घरीच थांबा

Abhijeet Shinde

कॅनडा भारताला करणार 10 दशलक्ष डॉलर्सची मदत

datta jadhav

कोरोनाबळींच्या संख्येत मेक्सिको जगात तिसऱ्या स्थानावर

datta jadhav

कोरोनाबाधित नेत्यांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

इराक पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला

Patil_p
error: Content is protected !!