तरुण भारत

स्टँड ऑफ अँटी टँक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर स्टँड ऑफ अँटी टँक (SANT) क्षेपणास्त्राची हवाई दलाच्या एमआय-35 हिंद गनशिप हेलिकॉप्टरमधून यशस्वी चाचणी घेण्यात आली.  

Advertisements

हलक्या लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी आणि एएलएच रुद्र एमके 4 साठी भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने डीआरडीओच्या ‘इमरत’ या संसोधन संस्थेने हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र 7 ते 8 किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून, नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज 15 ते 20 किमी आहे. भारतीय हवाई दल आणि लष्करातील एव्हिएशन कॉर्प्सला 4 हजार क्षेपणास्त्राची गरज असून, डीआरडीओ 2021 पूर्वी ती मागणी पूर्ण करणार आहे.

दरम्यान, रविवारी चेन्नईतील स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएसमधून अरबी समुद्रातील एका लक्ष्याला निशाणा बनवत ब्रह्मोस सूपरसोनिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

Related Stories

दिल्लीत गेल्या 24 तासात 961 नवे कोरोना रुग्ण; 15 मृत्यू

pradnya p

सोनिया-राहुल गांधी उपचारासाठी अमेरिकेला

Patil_p

एक इंच जागा गमावलेली नाही!

Patil_p

झारखंडमध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

pradnya p

पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढणार

datta jadhav

पश्चिम बंगाल : 15 जूनपर्यंत निर्बंध कायम; ममता बॅनर्जी म्हणाल्या…

pradnya p
error: Content is protected !!