तरुण भारत

`ट्रॉमा’मधील रूग्णांच्या केसपेपरची पडताळणी होणार

सीपीआर ट्रॉमा केअर सेंटर स्फोट प्रकरण

चौकशी समितीने मागवली घटनेनंतर मृत्यू झालेल्यांच्या उपचाराची माहिती, दोन दिवसांत अहवाल सादर होण्याची शक्यता

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमधील ट्रॉमा केअर युनीटमध्ये 30 ऑगस्टला पहाटे स्फोट झाला, या घटनेसाठी नियुक्त सात सदस्यीय चौकशी समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआरच्या वैद्यकीय अधिक्षकांकडून माहिती घेतली. यामध्ये ट्रॉमा युनीटमध्ये घटनेवेळी उपचार घेत असलेले रूग्ण, त्यानंतर तिघांचा झालेला मृत्यू अन् त्यांच्यावरील औषधोपचाराच्या माहितीचा समावेश आहे. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दोन दिवसांत चौकशी समिती अंतीम अहवाल सादर करेल, अशी शक्यता अधिकृत सुत्रांनी व्यक्त केली.

`सीपीआर’मधील ट्रॉमा केअर वॉर्डमध्ये 30 ऑगस्टला पहाटे शॉर्टसर्किटने स्फोट झाला. घटनेवेळी वॉर्डमध्ये 15 रूग्ण उपचार घेत होते. त्यातील चौघे हायरिस्क होते. ज्या कक्षात स्फोट झाला, तेथे चौघांना व्हेटिलेंटर लावला होता. स्फोटानंतर धूर झाला, त्यानंतर काही मिनिटांत वॉर्डमधील अन्य रूग्णांना अन्य अतिदक्षता विभागात हलवले होते. त्यानंतर दुपारी त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीच्या 15 दिवसांत दोन बैठका झाल्या. पण अद्यापी अंतीम अहवाल सादर झालेला नाही.

ट्रॉमा स्फोट घटनेवेळी वॉर्डमधील सीसीटीव्ही बंद होते, अशी चर्चा आहे. त्यामुळे घटनेचे फुटेज मिळण्यात अडचणी येत आहेत. स्टाफचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. त्याची माहिती चौकशी समितीला दिली आहे. अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम, इलेक्ट्रिकल विभाग, बायो इंजिनिअरचा रिपोर्टही मिळाला आहे. याची छाननी समितीने केली आहे. दरम्यान, सोमवारी चौकशी समितीने घटनेनंतर मृत्यू झालेल्या तीन हायरिस्क रूग्णांची माहिती घटनेपुर्वी संबंधितांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली होती का, याची चौकशी समिती करत आहे. घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी यासंदर्भात आरोपही केला होता. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्या रूग्णांच्या केसपेपर, त्यांच्यावर झालेले उपचार याची नोंद समिती घेणार आहे. त्यातूनच ट्रॉमा केअर सेंटर स्फोट प्रकरणी दोषी कोण, हे समिती मांडणार आहे. दोन दिवसांत यासंदर्भातील अंतीम अहवाल समिती अधिष्ठात्यांना सादर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भैरवनाथ-जोगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवातील पारंपरिक विडासोहळा संपन्न

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसात दुसऱ्यांदा नवे रूग्ण शेकड्यात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : म्युकरने दोघांचा मृत्यू, 3 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

केळोशी बु॥ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला, उजव्या कालव्यातून पाण्याचा थेट विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!