तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या 43 हजारांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर हिटमधील हे चित्र रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर गेल्याचे दर्शवत आहे. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजारांखाली येण्याचे संकेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रेट साडेआठ टक्क्यांवर आला आहे. कोल्हापूरकरांसाठी हे दिलासादायी चित्र आहे. सद्यस्थितीत शासकीय कोरोना केअर सेंटर सुरूच राहणार आहेत. `ऑक्टोबर हिट’नंतर दुसरी लाट आल्यास संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 47 हजार 290 रूग्ण आहेत. त्यापेकी 43 हजार 309 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 594 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 387 रूग्ण उपचार घेत आहेत. ही आकडेवारी पाहता कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनामुक्तांची टक्केवारी 91. 58 टक्के आहे तर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण टक्केवारी 8.42 टक्क्यांवर आहे. सप्ताहभरापुर्वी कोरोना मृत्यू दर टक्केवारी 3. 2 इतकी होती. सध्या ती 3 टक्क्यांवर आहे. कोमॉर्बीड रूग्णांतील हायरिस्क रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ही टक्केवारी 1 टक्क्यांपर्यत खाली येण्यास डिसेंबरपर्यत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वैद्यकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात जुलैमध्ये 5 हजारांवर कोरोना पॉझिटिव्ह होते. ऑगस्टमध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला. हा सामुहिक संसर्ग वाढत गेला. त्यात 17 हजार 778 नव्या रूग्णांची भर पडली अन् रूग्णसंख्या झपाट्याने 25 हजारांवर गेली. सप्टेंबरमध्ये ऍनलॉकचे तीन टप्पे पूर्ण झाले. या महिन्यात 21 हजार 518 नवे रूग्ण दिसून आले. हे सामुहिक संसर्गाचे उच्चांकी टोक होते. या दरम्यान ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्याने कोरोना मृत्यूदरवाढ झाली. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे कोरोना नियंत्रणाला यश आले आहे. ऑक्टोबरच्या पहिला पंधरवडा संपला असून जिल्हÎात फक्त 2 हजार 672 सक्रीय रूग्ण आहेत.

ऑक्टोबर हीट, मध्येच बरसलेला परतीचा पाऊस अन् पुन्हा ऑक्टोबर हीट हा वातावरणातील बदलही कोरोना नियंत्रणाला पोषक ठरत आहे. नवरात्रौत्सव सुरू आहे. प्रशासनाने गर्दी टाळण्याचे पाऊल टाकले आहे. त्याला चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे सध्या कोरोनामुक्तीचा, रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर असून तो ऑक्टोबर अखेरीस 95 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. नोव्हेंबरमध्ये नक्कीच कोल्हापूरकर कोरोनामुक्त होतील, असे दिलासादायी चित्रच सध्या पहायला मिळतेय. सात महिन्यांनंतर कोरोनाचा `कहर’ पुर्णपणे कमी झाल्याचे वास्तव समोर येत आहे.

कोरोनाचा चढता अन् उतरता आलेख
महिना कोरोनाचे नवे रूग्ण
मार्च 1
एप्रिल 12
मे 693
जून 243
जुलै 5462
ऑगस्ट 17778
सप्टेंबर 21518
ऑक्टोबर 15 अखेर 2672

कोरोना मृत्यू दर ः गेल्या सप्ताहात 3.2 टक्के
या सप्ताहात 3.0 टक्के
पॉझिटिव्ह रिकव्हरी दर ः गेल्या सप्ताहात 90 टक्के
या सप्ताहात 91.58 टक्के
कोरोना पॉझिटिव्ह दर ः गेल्या सप्ताहात 10 टक्के
सध्या 8.42 टक्के आहे.

Related Stories

महिन्याअखेरला चित्रनगरीत लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन…

Abhijeet Shinde

कागल तालुक्‍यासाठी 500 कोरोना बेडची व्यवस्था – मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला रविवारपासून

Sumit Tambekar

गांजा नशाबाजाकडून कबनुरात दोघांवर सशस्त्र हल्ला

Abhijeet Shinde

गांजा, मोबाईल कळंबा कारागृहातील टोळीसाठी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण एक, अख्ख गाव लॉकडाऊन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!