तरुण भारत

लहान भावाने केला मोठय़ा भावाचा खून

मुचंडी येथील घटना : नशेत शिवीगाळ करणाऱया भावावर टॉमीने हल्ला करून केला खून

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

नशेत शिवीगाळ करणाऱया मोठय़ा भावाच्या डोक्मयात टॉमीने हल्ला करून लहान भावाने त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा मुचंडी (ता. बेळगाव) येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

कृष्णा शिवाजी कालकुंद्री (वय 30, रा. चंदगड, ता. बेळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णाचा लहान भाऊ मारुती उर्फ मिथून शिवाजी कालकुंद्री (वय 28) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई नागुली हिने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशेत झालेल्या भांडणानंतर खुनाचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

मारिहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला कृष्णा व आरोपी मारुती हे दोघे सख्खे भाऊ आहेत. कृष्णाला दारूचे व्यसन जडले होते. त्याला कुटुंबीयांनी दारू सोडण्यासाठी अनेक वेळा समजावून सांगितले होते. नशेत घरी आला की तो आरडाओरड करत शिवीगाळ करायचा. रविवारी रात्री 11 वाजता नशेत आलेल्या कृष्णाने शिवीगाळ सुरू केली होती. शिवीगाळ करू नकोस असे मारुतीने वारंवार सांगूनही त्याने शिवीगाळ थांबविली नाही. त्यामुळे राग अनावर झालेल्या मारुतीने टॉमीने कृष्णाच्या डोक्मयात हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळलेल्या कृष्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

लोकमान्यतर्फे महेश फौंडेशनला ब्लँकेटचे वाटप

Amit Kulkarni

खासगी रुग्णालयातही कोरोनावर मोफत उपचार

Omkar B

कर्नाटक : व्हेंटिलेटर खरेदीत भ्रष्टाचार : डी.के. शिवकुमार

Abhijeet Shinde

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 94 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

जाधवनगरातील उद्यानाची दुरवस्था

Patil_p

निपाणीत हुतात्मादिन गांभीर्याने

Patil_p
error: Content is protected !!