तरुण भारत

सातारा : ‘छत्रपतींचे सेवक ग्रुप’कडून किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राज महालाची स्वच्छता

प्रतिनिधी / सातारा

मराठ्यांची राजधानी असलेल्या किल्ले अजिंक्यतारावरच्या राज सदरेवरून दिलेल्या आदेशानुसार अटकेपार झेंडा मराठ्यांनी फडकला. त्या किल्ल्यावरच्या राज महालाची स्वच्छता छत्रपतींचे सेवक या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी केली.

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराणी ताराबाई यांच्या स्वतंत्र्य साम्राज्याचा छत्रपती शाहू महाराजांनी उभी केलेली स्वराज्याची चौथ्या राजधानीच्या कारभाराचा संबंध मराठा साम्राज्याचा विस्ताराचा साक्षीदार, सरकारी सदरेतील ऐतिहासिक वाडा श्री राजधानी अजिंक्यतारा गडावरील एवढी मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा वाडा आज नामशेष होत चालेला आहे. आज जे काही ऐतिहासिक वाड्याचे अवशेष आहेत त्याचे संवर्धन व्हावे या भावनेतून रविवारी १८ रोजी त्याठिकाणी स्वच्छता मोहीम घेऊन ऐतिहासिक वास्तूमधील व बाजूचा पूर्ण भागावरील गवत स्वच्छ करून ऐतिहासिक वास्तूला मोकळा श्वास देण्यात आला.

मोहिमेत काजल संकपाळ, गणेशराव गुजर, प्रणित नलवडे, कुशल निंबाळकर, सुमित सुतार, अभिजीत जाधव, राहुल जाधव, फौजी निलेश वाघमळे, स्वप्निल शिंदे, स्वप्निल भोसले, अक्षय शिंदे , नचिकेत चावरे, रोहित चव्हाण ह्या सर्व दुर्गसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Stories

स्वराज्य भूमीतून मावळ्यांचे पानिपतला प्रस्थान

datta jadhav

एमआयडीसीत भंगार चोरटय़ांचा हैदोस

Patil_p

बांधकाम विभागात सगळेच गायब

Patil_p

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

Patil_p

कराडची मुख्य भाजी मंडई कधी सुरू होणार?

Patil_p

आजपासून हॉटेल-रेस्टॉरंट सातारकरांच्या सेवेत

Patil_p
error: Content is protected !!