तरुण भारत

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निमगाव (ह) येथील आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

करमाळा / प्रतिनिधी

जातीवाचक शिवीगाळ व शेत जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी कायदया अंतर्गत गुन्हयातील आरोपींना अटक पूर्व जामीन बार्शी येथील मे.अति.जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एस. पाटील यांनी मंजूर केला आहे. 
याबाबत माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील  निमगाव (ह) येथील शेतकरी अंकुश राजाराम भोसले, विजय अंकुश भोसले, श्रीराम अंकुश भोसले, सुलभा अंकुश भोसले, रा.सर्व जण निमगाव (ह), ता.करमाळा यांच्या विरुध्द करमाळा पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.927/2020 नुसार भा.दं.वि. संहिता कलम 447, 504, 506, 34 कलमा अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

Advertisements

सदरच्या गुन्हयामध्ये फिर्यादी अमित बाबुराव जागते रा.निमगांव(ह) यांनी सदर आरोपीच्या विरुध्दात जमिनीच्या वादातून आम्हांला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी फिर्याद दिल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला होता. 
सदर गुन्हयाची सुनावणी आज बार्शी येथील मे.अति.जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एस. पाटील यांच्या समोर झाल्यानंतर वरील आरोपींना अटकपूर्व अर्ज मंजूर केलेला आहे. 

या खटल्यामध्ये आरोपींच्या वतीने करमाळा येथील ॲड.राहुल सावंत, व बार्शी येथील ॲड.अविनाश जाधव यांनी काम पाहिले. तर सरकारी पक्षा तर्फे ॲड.दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

Related Stories

सोलापुरात नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

कोंडवेत महिलेस मारहाण करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

दिलासाः सांगली जिल्हय़ात तब्बल 489 रूग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

खवल्या मांजराची तस्करी करणारे पाच जण वनविभागाच्या जाळय़ात

Patil_p

विशेष अधिवेशनाचे धाडस दाखवा : उदयनराजे

Abhijeet Shinde

पुण्यात 12 तासात कोरोनाचे 5 बळी

prashant_c
error: Content is protected !!