तरुण भारत

मालगावमध्ये विहिरीत पडून सख्ख्या जावांचा मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पडल्या, एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघींचाही मृत्यू

प्रतिनिधी/मिरज

मिरज तालुक्यातील मालगाव येथे दोन सख्ख्या जावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. सारिका महावीर पाटील (वय 33) आणि अर्चना सुरगोंड पाटील (वय 36) अशी मृत महिलांची नवे आहेत.

मालगाव-सावळी रोडवर असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर यापैकी एक जण पाय घसरून पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसरीलाही आपला जीव गमवावा लागला. जीव रक्षक टीमच्या जवानांनी दोघींचा मृतदेह बाहेर काढला. एकाच कुटुंबात दोन महिलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मालगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

सांगली : प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील चित्रपटगृहे सुरू करण्यास सशर्त परवानगी – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

विट्याला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

सांगली : जिल्हा बँकेसाठी मतदानाला प्रारंभ

Sumit Tambekar

बारा तोळे सोन्यासह पंधरा लाखांची फसवणूक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

जत येथे शासकीय धान्य गोदामावर चोरट्याचा डल्ला

Abhijeet Shinde

सांगली : उटगी ग्रामपंचायत तंटामुक्त समिती सदस्याचाच खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!