तरुण भारत

मराठा मंडळ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल जाहीर

प्रतिनिधी/ खानापूर

राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे बी. ए. आणि बी. कॉम अंतीम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या बी. ए व बी.कॉम क्षेत्रातील अंतीम वर्षाचा निकाल 100 टक्के लागला असून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी चांगल्या शेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Advertisements

यामध्ये बी. ए. अंतीम वर्षात श्रृती गावडा हिने 85.38 टक्के मिळवून प्रथम क्रमांक, जयश्री अंबेवाडकर हिने 83.67 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर सुनिता लांबोर हिने 80.92 टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शिवाय बी. कॉम क्षेत्रातील अंतीत वर्षात वीणा पाटील हिने 87.43 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, गायत्री कोलकार हिने 86.19 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर आरती बावकर हिने 85.57 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदर विद्यार्थ्यांना मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजु, प्राचार्य गजानन बेन्नाळकर व सर्व प्राध्यापक वर्गाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Stories

तपासणीसाठी सिव्हिलमध्ये येणाऱया संशयितांचा ओघ सुरूच

Patil_p

अर्धवट गटारीच्या कामामुळे दलदलीचे साम्राज्य

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात बुधवारी कोरोनाचे 41 नवे रुग्ण

Rohan_P

कोरोनाबाधितांना आता मुंग्यायुक्त अंडी!

Patil_p

एसडीएम धारवाड अ, ब, बीडीके हुबळी, आनंद अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगावात दाखल झाली नैसर्गिक अळंबी

Omkar B
error: Content is protected !!