तरुण भारत

जनधन खात्यांमध्ये महिलाच आघाडीवर

9 सप्टेंबर पर्यंत एकूण 40.63 कोटी खाती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशात सर्वसामान्य जनतेला बँकिंग सुविधेचा लाभ घेता यावा आणि त्याच्या आधारे सरकारी पातळीवर देण्यात येणाऱया विशेष सुविधांचा लाभही देशातील लोकांना घेता यावा याकरीता पंतप्रधान जनधन योजना (पीएमजेडीवाय) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बँक खाती उघडण्यामध्ये महिलाच आघाडीवर राहिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

9 सप्टेंबर 2020 पर्यंत या योजनेतून एकूण 40.63 कोटी खाती उघडली होती. यात 22.44 कोटी बँक खाती महिलांची आणि 18.19 कोटी खाती पुरुषांची आहेत. मध्य प्रदेशातील एक कार्यकर्ते चंद्र शेखरगौड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना माहिती अधिकारातून ही सविस्तर माहिती समोर आली आहे. यात महिला व पुरुषांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या आकडेवारीचाही खुलासा करण्यात आला आहे. ही योजना लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे.

सप्टेंबर 9 पर्यंतची जमा रक्कम

आरटीआय अंतर्गत जनधनसंबंधी प्रश्नांना उतर देताना सप्टेंबरच्या प्रारंभापर्यंत जनधनयोजनेतील खात्यातील रक्कम 8.5 टक्क्यांनी रक्कम वधारुन 1.30 लाख कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली.  

Related Stories

एचडीएफसी म्युच्युअलने हिस्सेदारी जस्ट डायलमध्ये विकली

Patil_p

अदानी ग्रुप तिसऱया नंबरवर

Patil_p

उत्पादनाचा खुलासा न केल्यास दंड आकारणी

Patil_p

देशामध्ये सोन्याची मागणी 70 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

कार, मोटारसायकलच्या नंबरसाठी केंद्राची नवी योजना

Patil_p

ओएलएक्स ग्लोबल ऑटोची जबाबदारी गौतम ठाकर यांच्याकडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!