तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी

91 नवे रूग्ण, फक्त 70 जणांना डिसचार्ज

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूंची एकूण संख्या 1 हजार 614 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 91 नवे रूग्ण दिसून आले तर 70 जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी प्रथमच कोरोनामुक्तांच्या संख्येपेक्षा नव्या कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

 जिल्ह्यात बुधवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 542 जणांची तपासणी केली. त्यातील 141 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. सध्या 1 हजार 973 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 704 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 640 निगेटिव्ह तर 63 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 141 रिपोर्ट आले. त्यापैकी 134 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये नांदलापूर कराड सातारा येथील 49 वर्षीय पुरूष, कसबा बावडा कोल्हापूर येथील 75 वर्षीय महिला, लिंगनूर कागल येथील 79 वर्षीय पुरूष, वाशी करवीर येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये शिरटी शिरोळ येथील 78 वर्षीय पुरूषाचा तर कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये चेंबूर मुंबई येथील 67 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत ग्रामीण भागात 784, नगरपालिका क्षेत्रात 337 महापालिका क्षेत्रात 357 तर अन्य 136 जणांचा समावेश आहे.

  गेल्या 24 तासांत 51 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 43  हजार 982 झाली आहे. भुदरगड 2, चंदगड 2, गडहिंग्लज 7, हातकणंगले 8, कागल 2, करवीर 8, पन्हाळा 6, शाहूवाडी 2, राधानगरी 2, शिरोळ 6, नगरपालिका क्षेत्रात 10, कोल्हापूर शहर 30 आणि अन्य 6 असे 91 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची एकूण संख्या 1 हजार 607 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 51 नवे रूग्ण दिसून आले. आजपर्यत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजार 478 झाली आहे. तसेच 153 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 959 वर पोहोचली आहे. सध्या 1 हजार 959 रूग्ण उपचार घेत आहे. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजारांच्या खाली आली आहे.

                 पॉझिटिव्ह रूग्ण 91, कोरोनामुक्त 70, कोरोना  7 मृत्यू

                  आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 47 हजार 569

                  आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण  ः 43 हजार 982

                  सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः  1 हजार 973

                    आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1614

Related Stories

कोल्हापूर शहर अतिक्रमणमुक्त करा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर : काळमावाडी धरण 96.80 टक्के भरले, सुरक्षा रामभरोशे

Abhijeet Shinde

ऊस तोडणीसाठी मजुरांचे एकरावर दर, शेतकरी वर्ग हैराण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पट्टणकोडोलीत पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

Abhijeet Shinde

बिबट्या दिसल्याने गिरोलीसह सादळे, मादळे गांवाना सतर्कतेचा इशारा

Abhijeet Shinde

गवा आला रे! म्हणत दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकारांची पहाट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!