तरुण भारत

कियाच्या सोनेट कार बुकिंगला उत्तम प्रतिसाद

स्पर्धात्मक मॉडेल्सना मागे टाकण्यात सोनेटला आले मोठे यश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

किया मोटर्स इंडियाने सादर केलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातील ‘सोनेट’ ही कार तब्बल 50,000 पेक्षा अधिक जणांनी बुक केल्याची माहिती बुधवारी शेअर बाजाराला देण्यात आली. सोनेट मॉडेलसाठी ग्राहकांकडून बाजारात दोन महिने अगोदरच बुकिंग सुरु करण्यात आले आहे. सोनेट बुकिंगच्या आकडेवारीतून एसयूव्ही गटातील वाहनांना ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात पसंती दर्शवल्याचा हा एक यशस्वी दाखला असल्याचेही कंपनीने आवर्जून म्हटले आहे.

सदर मॉडेलचे बुकिंग हे 20 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आले होते. कंपनीला सोनेट वाहनाप्रति भारतीय ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद स्पृहणीय वाटतो आहे. याचाच अर्थ स्पोर्टस् युटिलीटी गटात वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे, हे यातून दिसत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

प्रति मिनिटाला दोन ऑर्डर

बुकिंग सुरु झाल्यानंतर प्रत्येक मिनिटाला दोन ऑर्डर मिळाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये सोनेट विक्रीचा आकडा हा 9,266 युनिटवर राहिला आहे. सोनेटला बाजारात दाखल केल्यानंतर व किमतीची घोषणा केल्याच्या 12 दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात बुकिंग झाले. कॉम्पॅक्ट एसयूव्हीमधील एक अग्रणी मॉडेल म्हणून ओळख निर्माण केली असल्याची माहिती आहे.

Related Stories

कर शुल्क वाढीचा मद्यविक्रीवर परिणाम

Patil_p

वाहन क्षेत्रात ट्रक्टर नोंदणी जोमात

Patil_p

अशोक लेलँडची व्हीआरएस योजना

Omkar B

एलएनजी स्टेशन सुरु करणे होणार सोपे

Patil_p

एचसीएलकडून कर्मचाऱयांना दिलासा

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 503 अंकांनी मजबूत

Patil_p
error: Content is protected !!