तरुण भारत

उचगावच्या नवविवाहितेची आत्महत्या

सुळगा (हिं.) येथील माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ

वार्ताहर / उचगाव

Advertisements

उचगाव येथील ज्योती निखिल चोपडे (वय 19) या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने सुळगा (हिं.) येथील आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.

या घटनेची अधिक माहिती अशी की, सुळगा (हिं.) येथील गावडू पाटील यांची ज्योती ही कन्या असून तिचे उचगाव येथील निखिल प्रभाकर चोपडे या युवकाशी गेल्या तीन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन काळात रितसर लग्न झाले होते.

रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी ज्योती आपल्या माहेरी सुळगा गावी राहण्यासाठी आली होती. बुधवारी सकाळी तिचा पती निखिल सुळगा येथे आला होता. तो कामाला जाणार असल्याने जेवणाचा डबादेखील ज्योतीने बांधून दिल्याचे तिच्या घरच्या मंडळींकडून सांगण्यात आले. ज्योतीची आई गावी गेल्याचे कळते तर वडील सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले होते. ज्योती घरी एकटीच होती. घरातील सर्व मंडळी बाहेर गेल्यानंतर तिने एका खोलीमध्ये लाकडी तुळईला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेचा पंचनामा काकती पोलिसांनी केला. वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवचिकित्सेसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिला. पोलीस पुढील तपास करीत
आहेत.

Related Stories

पुन्हा डौलाने फडकू लागला सर्वात उंच तिरंगा

Patil_p

जिल्हय़ातील 31 हजार नवीन रेशनकार्डे पात्र

Patil_p

किल्ल्याजवळ मानवी पाय सापडल्याने खळबळ

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी बेळगावचे पाऊल पडते पुढे

tarunbharat

मारुती गल्ली येथे खासगी डॉक्टरांना धक्काबुक्की

Amit Kulkarni

देसूर येथे वीट व्यवसायाला लवकरच प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!