तरुण भारत

मिरजेतील तंतूवाद्यांना आता सप्तरंगांचा साज

आता मेटॅलिक रंगांचा वापर, रंगीत तंतूवाद्यांना ग्राहकांची पसंती

मानसिंगराव कुमठेकर / मिरज

Advertisements


‘तंतूवाद्यांचे माहेरघर’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायाने आता कात टाकली असून, येथील युवा तंतूवाद्य कारागिरांनी तंतूवाद्य निर्मितीत नवनवे प्रयोग केले आहेत. पूर्वी पारंपारिक रंगात उपलब्ध असणारी तंतूवाद्ये आता आकर्षक अशा विविध रंगात उपलब्ध होऊ लागली आहेत. सतारी, तंबोरे यांना पूर्वीच्या लाखेच्या रंगाऐवजी आता रंगीबेरंगी मेटॅलिक रंग देण्यात येऊ लागले आहेत. विविध रंगातील या सतारी आणि तंबोऱ्यां देश-परदेशातील कलाकारांकडून पसंती मिळत आहे.
गेली अनेक वर्षे स्पिरीट मिश्रीत पारंपारीक रंगांचा वापर तंतूवाद्यांसाठी होत होता. आता मात्र, हीच तंतूवाद्ये नव्या, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यासाठी मेटॅलिक रंगांचा वापर होऊ लागला आहे. चारचाकी गाड्यांना देण्यात येणारे आकर्षक रंग येथे तंतूवाद्यांना वापरण्यात येत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या रंगातील सतार आणि तंबोरे तयार करण्यात येत आहेत. ही तंतूवाद्ये आवाजाच्या बाबतीत दर्जेदार तर आहेतच, शिवाय आकर्षक अशा रंगात मिळत असल्याने ग्राहकांची पसंती त्याला मिळत आहे.

Related Stories

सांगली : मिरजेतील भाजी मंडईचे काम २० दिवसात सुरू करू – महापौर

Abhijeet Shinde

खासदार शरद पवार यांनी केले डाळिंब उत्पादकांचे कौतुक

Abhijeet Shinde

शाहू गव्हर्मेंट बँकेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा, १४ जागांवर विजय

Abhijeet Shinde

लकी ड्रॉमध्ये गाडी मिळाल्याचे सांगत पावणे तीन लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

मिरज शासकीय रूग्णालयात बालरूग्णांसाठी कोरोना सेंटर सज्ज

Abhijeet Shinde

सांगली : केंद्र व राज्य शासनाने माणसी पाच हजार मदत द्यावी : स्नेहल जाधव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!