तरुण भारत

कांद्याने गाठली शंभरी

प्रतिनिधी
पणजी

महाराष्ट्र, कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे गोव्याला कांद्यासह इतर भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजीपाल्यासाठी गोवा प्रामुख्याने शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकवर अवलंबून आहे. पण मुसळधार पावसामुळे कांद्यासह इतर भाज्यांच्या नासाडीमुळे गोव्याला पुरेशा प्रमाणात कांदा मिळणे कठीण झाले आहे. सध्या पणजीच्या खुल्या बाजारपेठेत कांदा ९० ते १०० रूपये या दरात विकला जात आहे. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तविली जात आहे.
कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोमंतकीयांचे आर्थिक उत्पन्न मंदावले आहे. त्यात आता जीवनावश्यक वस्तू, भाज्यांचे दरहि वाढले असल्याने सर्वसामान्य जनतेने काय खावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकर्‍यांचे पुष्कळ प्रमाणात नुकसान झालेले आहे. सध्या बाजारात कमी दर्जाचा कांदा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. कमी दर्जाचा कांदा आणि दर चढे असल्यामुळे कांदा खरेदी करण्यातहि ग्राहकांचा ओघ कमी प्रमाणात दिसून येतो.
सध्या पावसापासून जी काहि भाजी शिल्लक राहिलेली आहे ती भाजी देखील चढ्या दराने विकली जात आहे पणजी मध्ये कांद्याचा भाव काल सायंकाळी ९० रुपये प्रति किलो एवढा झाला होता तर आज तो शंभर रुपये आणि उद्या शंभर रुपये ओलांडून करून पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी ८० रूपये या दराने विकली जाणारी भेंडीने शंभरी गाठली आहे. तसेच टॉमेटो ५० रूपये किलो, बटाटे ५० रूपये, शिमला मिरची ८० रूपये, गाजर ६० रूपये, कारली ६० रूपये, हिरवी मिरची ८० रूपये, वालपापडी ६० रूपये, दोडकी ६० रूपये, वांगी ६० रूपये, काकडी ३० रूपये या दराने विकली जात आहे. याचबरोबर आले १०० रूपये किलो तर लसूण १६० रूपये किलो या दराने विकली जात आहे. पालेभाजी मेथी व पालक २० रूपयाला तीन व कोथिंबीर २० रूपये या दरानेविकली जात आहे. टंचाईमुळे महाराष्ट्र, कर्नाटकातून येणार्‍या भाजीपाल्याची आयात काहि प्रमाणात कमी झाली आहे. खुल्या बाजारात कांद्याप्रमाणेच इतर भाज्यांचे दरहि गगनाला भिडले असल्यामुळे सर्वसामान्य गोमंतकीयांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Related Stories

कोरोना रुग्णांचा आकडा 490

omkar B

कोरोना बळींचा आकडा 500 पार

Patil_p

कर्नाटक सरकार विरोधात गोव्याची अवमान याचिका

Patil_p

यवतमाळ : एसटी बसच्या भीषण अपघातात 4 मजूर ठार, 15 जखमी

datta jadhav

राज्यात 84 कोरोनामुक्त, 42 नवे रुग्ण

Patil_p

मुक्तीदिनी घुमणार जय हिंद ! म्हार्दोळ पोलिस स्थानकाचा सुर

omkar B
error: Content is protected !!