तरुण भारत

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा एकाचा प्रयत्न

प्रतिनिधी / रत्नागिरी:

शासनाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने आज गुरुवारी दुपारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात पोर्च मध्ये स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या पोलीस व लोकांनी त्याला प्रकारापासून परावृत्त केले. त्याच्याजवळ न फोडलेली विषाची बाटली देखील होती. आपणाला शासनाकडून न्याय मिळत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्याचे नाव शैलेश सुर्वे असून तो गवळीवाडा येथील असल्याचे कळते. या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे.

Advertisements

Related Stories

एसटी कर्मचारी संप सुरुच

Patil_p

लिंब खिंड येथे ट्रकला विचित्र अपघात

datta jadhav

सातारा : ‘महिला’ ही गुन्हेगारीत आघाडीवर

Abhijeet Shinde

सातारा : पुणे-बेंगळूर महार्गावर तेलाचा टँकर उलटला

prashant_c

आवश्यक पाटण तालुक्यातील येराड ठरतोय ‘हॉट स्पॉट’

Amit Kulkarni

सातारा तालुक्यातील रात्रीत 137 जण बाधित

Patil_p
error: Content is protected !!