तरुण भारत

व्हिसावरील बंदी उठवली; पर्यटन वगळता सर्वांना भारतात येण्यास मुभा

  • केंद्र सरकारने घेतला निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा बंदी आता हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय श्रेणी वगळता  सर्वांना प्रवासासाठी व्हिसा बंदी उठविल्याने याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

Advertisements


गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार पर्यटक वगळता सर्व ओसीआय, पीआयओ कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना व्हिसावर कोणत्याही हेतूने भारतात येण्याची परवानगी देत आहे. ते अधिकृतपणे चेक पोस्टद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश करू शकतात.


मात्र, परदेशातून येणाऱ्या लोकांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्वारंटाईन आणि कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय अटेंडंटसमवेत वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात.

Related Stories

आशा वर्कर्सच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ; अमित ठाकरे व अजित पवार भेट यशस्वी

Rohan_P

रविवारी होणार सर्वपक्षीय बैठक

Patil_p

ईपीएफओ रकमेवर 8.50 टक्के व्याजदर

Patil_p

भारतात 12,881 नवे कोरोनाबाधित; 101 मृत्यू

Rohan_P

इंधन दरवाढ : दोन महिन्यात 8.41 रुपयांनी महाग झाले पेट्रोल!

Rohan_P

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरण : ड्रग्ज पेडलर हरीश खानला अटक, NCB ची कारवाई

Rohan_P
error: Content is protected !!