प्रतिनिधी
पणजी
गोवा हा गोवेकरांसाठी आहे आणि आम्ही सरकारला याची निरंतर आठवण करून देत राहणार आहोत, जे सरकार फक्त अदानीच्या स्वार्थासाठी कार्यरत आहे. गोमंतकीयांच्या हिताची पायमल्ली करून गोमंतकीयांचा जीव आणि आरोग्य धोक्यात घालत आहेत. गोवा हा गोमंतकीयांसाठी असून अदानीसाठी नव्हे. अदानीच्या स्वार्थासाठी गोव्याला का विकले याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी द्यावे अशी मागणी आपचे प्रवक्त॓ व नेते सुरेल तिळवे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. बुधवारी करण्यात आलेली निदर्शने हा केवळ ट्रेलर होता. आमची चळवळ अजून वाढत जाणार असून काहिहि झाले तरीहि आपचे स्वयंसेवक म्हणून आमच्या हक्कांसाठी आम्ही कुठल्याहि दिशेने प्रयत्न केल्याशिवाय सोडणार नाहि. आप गोव्याच्या लोकांबरोबर सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये व कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभा राहणार आहे. गोव्याचे नशीब हे केवळ गोवेकरांनीच निश्चित केले पाहिजे. अदानीने नव्हे किंवा दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांनी नव्हे.
रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला अदानीसाठी मान्यता देण्याआधी गोवेकरांना का विचारले नाहि, याचबरोबर या प्रकल्पामुळे लोकांना होणार्या फायद्याबद्दल सांगावे. कोळसा वाहतूकीचे परिणाम सहन करण्यासाठी आपण स्वतः ट्रॅकच्या आवारात राहायला तयार आहात का, गोमंतकीयांचे हित पायाखाली तुडवून त्यांचा जीव आणि आरोग्य धोक्यात घालून दिल्लीतील भाजप नेत्यांचे आदेश मानण्यात धन्यता का दाखविली. मागील पाच वर्षात अदानीनी भाजपचा पक्ष आणि पक्षाच्या नेत्यासाठी किती प्रमाणात अथवा काय देणाऱ्या दिल्या याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी सुरेल तिळवे यांनी यावेळी केली. काँग्रेस आणि भाजप पक्षांची सत्ता असताना गोव्यासाठीचे निर्णय दिल्लीमध्ये घेतले गेले जे गोमंतकीयांच्या इच्छेविरूद्ध होते. गोमंतकीय जनता यापुढे हे सहन करणार नाहि. यापुढे गोव्यासाठी गोवेकरच निर्णय घेतील असे तिळवे यांनी सांगितले.


previous post