तरुण भारत

बहिरेश्वर सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती

-उच्च न्यायालयाचे जिल्हा प्रशासनाला आदेश

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

बहिरेश्वर तालुका करवीर ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. पुढील सुनावणी 29 रोजी होणार आहे. थेट जनतेतून निवडूण येवूनही सदस्यांच्या अविश्वास ठरावावर पद रद्द करुन नव्याने सरपंच निवड प्रक्रिया सुरु केली होती. यास सरपंच साऊबाई बचाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

याबाबत अधिक माहिती अशी सत्ताबदलानतंर ग्रामविकास विभागाने थेट सरपंच निवडीचे नियम बदल केले. 16 सप्टेंबरला रोजी ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी काढलेल्या पत्रात ग्रामसभा रद्द करून ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांवर अविश्वास ठरावाबाबत निर्णय घेण्यास अधिकार दिले. या आधारे सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. 29 सप्टेंबरला तीन चतुर्थांशने तो मंजूर झाला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी उपसचिवांच्या पत्राच्या आधारे मंडल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 26 ऑक्टोबरला सरपंच निवड होणार होती. या विरोधात बजाटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी पहिल्या सुनावणीतच निवडीला स्थगिती मिळाली. अशी माहिती अॅड. किरण पाटील, तेजस हिलगे यांनी दिले.

Related Stories

हातकणंगले येथे धक्कादायक प्रकार : सर्वच पोलीस कर्मचारी झाले गायब

Abhijeet Shinde

मोकाट कुत्र्याने घेतला दोन मुलांचा चावा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्वाभिमानीने फाडले ऊसदराचे करार

Abhijeet Shinde

` ‘राजारामकाळात’ करवीर संस्थानमध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया

Sumit Tambekar

राशिवडेत परप्रांतीय महिलेची आत्महत्या

Abhijeet Shinde

नदीपात्रातील अतिक्रमणाचा शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे आवश्यक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!