तरुण भारत

ग्लोब थिएटरजवळ ट्राफिक सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा

वाहतूक रहदारीनुसार सिग्नलचा वेळ निश्चित करण्याची गरज

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सध्या आरटीओ चौक आणि ग्लोब थिएटरजवळील ट्राफिक सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ग्लोब थिएटरजवळील ट्राफिक सिग्नलमुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. दुपारच्या वेळी लाल सिग्नल असतानाही वाहनचालक बेफामपणे जात आहेत. त्यामुळे या सिग्नलचा उपयोग काय, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध चौकात ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले असून, काही ठिकाणचे सिग्नल कार्यान्वित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील 16 चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल सुविधा बसविण्यात आली आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि शिल्लक कामे करण्यात येत असल्याने चौकातील सिग्नल व्यवस्था सुरू करण्यात आली नाही. सध्या आरटीओ चौक आणि ग्लोब थिएटरजवळील ट्राफिक सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. आरटीओ चौकात प्रथमच सिग्नल सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. जवळच बस डेपो आणि आरटीओ कार्यालय असल्याने वाहनांची गर्दी होत असते. जवळपास पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्याशेजारी वाहने पार्क करण्यात येतात. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. हा चौक अरुंद असल्याने वाहने जाण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे येथील दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवून अडचणी दूर करण्याची गरज आहे.

ग्लोब थिएटरजवळ चार रस्ते मिळत असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. परिसरात अनेक शाळा असल्याने विद्यार्थी व पालकांची रेलचेल असते. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडले आहेत. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्राफिक सिग्नल सुविधा बसविण्यात आली आहे. सदर सिग्नल सुविधा अलीकडेच कार्यान्वित करण्यात आले असून, सुरळीत रहदारीसाठी उपयोगी ठरण्याची शक्मयता आहे. पण चौकात ट्राफिक सिग्नलचा अवधी वेळेनुसार आणि रहदारीनुसार निश्चित करणे गरजेचे आहे. स्वतंत्रता मार्गाने शहरात येणाऱया वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे सिग्नलचा वेळ वाहतुकीनुसार निश्चित करणे गरजेचे आहे. पण चारही रस्त्यांच्या सिग्नलचा वेळ एकच ठेवण्यात आला आहे.  विशेषत: सकाळी आणि सायंकाळच्या वेळी खानापूर रोडवर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे या वेळेत खानापूर रोडहून ये-जा करणाऱया वाहनांच्या रांगा लागत आहेत. पण दुपारच्या सत्रात वाहतुकीचा ताण असल्याने सिग्नलचा वेळ कमी करण्याची आवश्यकता आहे. मात्र, रस्त्यावर वाहने नसतानाही लाल दिवा चालू असतो. त्यामुळे दुपारच्या वेळी वाहनधारक सिग्नलकडे दुर्लक्ष करून लाल दिवा सुरू असतानाच बेफामपणे वाहने चालवित आहेत. गोगटे सर्कलकडून ग्लोब थिएटर चौकाकडे येताना येणाऱया वाहनांना चौकामधून उजवीकडे वळण्यास बंदी आहे. तरीही बंदी झुगारून वाहनधारक उजवीकडे वळत आहेत. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्मयता आहे. या ठिकाणी ट्राफिक सिग्नल सुविधा बसवूनदेखील निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे वाहतूक रहदारीनुसार सिग्नलची वेळ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.    

Related Stories

बेळगाव शहर-तालुक्याचा डोलारा एकाच अग्निशमन केंद्रावर

Amit Kulkarni

लोखंडी कमान कशासाठी?

Patil_p

जिल्हय़ातील आणखी नऊ जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

शहापूर मुस्लीम समाज समितीच्या पाठीशी

Amit Kulkarni

प्रवाशांच्या संख्येत वाढ…परिवहनला दिलासा

Patil_p

कर्नाटकात आणखी 13 रुग्णांची भर

Patil_p
error: Content is protected !!