तरुण भारत

पॅरिस मास्टर्समधून जोकोविचची माघार

वृत्तसंस्था / बेलग्रेड

पुढील महिन्याच्या प्रारंभी होणाऱया पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने माघार घेतली आहे. वर्षअखेरचे अग्रस्थान कायम राखण्यासाठी आपल्याला मानांकन गुण मिळणार नसल्याने या स्पर्धेतून माघार घेतल्याचे त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisements

‘2 ते 8 नोव्हेंबरपर्यंत होणाऱया पॅरिसमधील स्पर्धेत मला गुण मिळणार नसल्याने मी त्यात सहभागी होणार नाही. मात्र व्हिएन्ना व लंडनमधील स्पर्धेत मी निश्चितच सहभागी होईन,’ असे जोकोविच म्हणाला. ‘व्हिएन्नात मी 500 गुण तरी मिळवू शकतो, गेल्या वर्षी मी त्या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. याशिवाय लंडनमधील स्पर्धेत भरपूर गुण मिळविण्याची संधी असेल,’ असेही त्याने सांगितले.

गेल्या महिन्यात जोकोविचने रोममध्ये इटालियन ओपन स्पर्धा जिंकून विक्रमी 36 वे एटीपी मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावत राफेल नदालचा विक्रम मागे टाकला होता. नदालने मात्र प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर पॅरिस मास्टर्स स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले होते. मात्र 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया व्हिएन्नातील स्पर्धेत नदालने प्रवेश घेतलेला नाही.  तरीही लंडनमध्ये 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया एटीपी फायनल्स स्पर्धेत तो भाग घेण्याची अपेक्षा आहे. कोरोना महामारीच्या कारणास्तव एटीपीने मानांकन गुण देण्याची सुधारित पद्धत सुरू केली असल्यामुळे जोकोविचने पॅरिसमधील स्पर्धा टाळली तरी त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. या सुधारित पद्धतीनुसार खेळाडूंना गेल्या वर्षीचे गुणही राखता येणार आहेत.

Related Stories

विल्यम्सनचे झुंजार द्विशतक, न्यूझीलंडचा 519 धावांचा डोंगर

Patil_p

बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी मनप्रीत सिंगकडे नेतृत्व

Patil_p

मेक्सिकोचे दोन खेळाडू कोरोना बाधित

Patil_p

क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण शिबिराची घाई करणार नाही

Patil_p

छत्रसाल स्टेडियमवर कुस्ती प्रशिक्षणाला प्रारंभ

Patil_p

बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्ससाठी भारतीय स्पर्धक सज्ज

Patil_p
error: Content is protected !!