तरुण भारत

लाखो वर्षे जुन्या नदीचे थार वाळवंटात सापडले पुरावे

     1,72,000 वर्षांपूर्वी वाहत होत नदी

नवी दिल्ली

 1,72,000 वर्षांपूर्वी राजस्थानच्या बिकानेरनजीक थार वाळवंटाच्या मधून वाहणाऱया नदीचे पुरावे सापडले आहेत. सध्या लुप्त झालेली ही नदी पुरातन काळात या भागातील लोकांची जीवनरेषा असावी असे संशोधकांचे मानणे आहे. हजारो वर्षांपूर्वीपर्यंत ही नदी नाल कॅरीमध्ये वाहत होती, असे जर्नल क्वार्टनरी सायन्स रिह्यूजमध्ये प्रकाशित लेखात म्हटले गेले आहे. नदीचा शोध जर्मनीच्या द मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट ऑफ ह्यूमन हिस्ट्री, तामिळनाडूतील अण्णा विद्यापीठ आणि कोलकाता येथील आयआयएसईआरने मिळून लावला आहे. पाषाणयुगात या नदीमुळे या भागात मनुष्यवस्ती निर्माण झाली असावी, असे संशोधकांचे मानणे आहे.

संशोधनात मिळालेल्या पुराव्यांनुसार 1 लाख 72 हजार वर्षांपूर्वी बिकानेरनजीक वाहणाऱया नदीचे प्रवाहस्थळच्या सध्याच्या नदीपासून 200 किलोमीटर अंतरावर होते. अति-प्राचीन नदीचे पुरावे मिळाल्याने कोरडी पडलेल्या घग्गर-हकरा नदीविषयीही माहिती मिळते. हजारो वर्षांपूर्वी मोठय़ा लोकसंख्येने नदीकाठावरून स्थलांतर केले असावे असे संशोधकांनी म्हटले आहे.

थार वाळवंटातील रहिवाशांना लुप्त नद्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष केले आहे. ऐतिहासिक काळापासूनच थार वाळवंटाचा महत्त्वपूर्ण इतिहास राहिला आहे. उपग्रहीय छायाचित्रांद्वारे थार वाळवंटातून वाहणाऱया नद्यांच्या दाट जाळय़ांचा शोध लागतो असे संशोधकांनी नमूद केले आहे.

Related Stories

कोरोनावर लस येईपर्यंत दक्षता हाच उपाय

Patil_p

चीन सीमेवरील गस्त कायम -आयटीबीपी

Patil_p

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

prashant_c

रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, 31 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

pradnya p

मध्यप्रदेशात गो-तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; भाजप नेताच मुख्य आरोपी

datta jadhav

राज्यात एकाच दिवशी 14 संसर्गमुक्त

Patil_p
error: Content is protected !!