तरुण भारत

जिल्हा महिला कॉंग्रेसच्या फलटण, माण तालुका निवडी जाहीर

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या सातारा जिह्यात जिल्हा महिला कॉगेसच्या तालुका निहाय निवडी पार पडल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस उपस्थित होत्या.

त्यांच्या निर्देशानुसार सातारा महिला काँग्रेस कमिटीत सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा धनश्री महाडिक यांनी फलटण तालुका अध्यक्षा पदी सुजाता गायकवाड व माण तालुका अध्यक्षापदी नकुशा जाधव यांची नियुक्ती केली. तसेच इतर पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी पदाधिकाऱयांना सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव व महिला अध्यक्षा धनश्री महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रजनी पवार, महेंद्र सुर्यवंशी बेडके, बाबासाहेब कदम, नंदाभाऊ जाधव, मनोजकुमार तपासे, मालन परळकर, सुषमा राजेघोरपडे, रजिया शेख, मंजिरी पानसे, बानू शेख व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Stories

उडतारेनजीक सेवा रस्ता गेला नदीत

Shankar_P

भटक्या कुत्र्यांच्या चाव्यात दोन बालके जखमी

Patil_p

सातारा : कोरोनाबळी कर्मचाऱ्याच्या वारसाला 50 लाखांचा धनादेश प्रदान

datta jadhav

सातारा : महामार्गावर बँक मँनेजरला चाकूचा धाक दाखवून लुटले

datta jadhav

हे राज्य ठोकशाहीचे

Patil_p

बावधन येथील युवकाची आत्महत्या

Shankar_P
error: Content is protected !!