तरुण भारत

नुकसानग्रस्त शेतकऱयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ- ना. दरेकर

प्रतिनिधी/ सातारा

अतिवृष्टीमुळे सातारा-जावली तालुक्यात झालेल्या पिक नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमवेत थेट शेतकऱयांच्या नुकसानग्रस्त शेतात जावून पाहणी केली. दोघांनी भात, सोयाबीन, भुईमूग आदी नष्ट झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱयांची गाऱहांनी ऐकून घेतल्यानंतर आ. शिवेंद्रराजे यांनी कर्जमाफी व इतर गोष्टीनंतर कराच पण आधी सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे असे सांगितले. यावर शेतकरी बांधवांनो तुम्हांला जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन दरेकर यांनी दिले. 

Advertisements

   प्रविण दरेकर, आ. शिवेंद्रराजे यांच्यासह भाजप पदाधिकारी, महसूल आणि कृषि विभागाच्या अधिकारी यांनी जावली तालुक्यातील रिटकावली, बिभवी आणि सातारा तालुक्यातील गजवडी, कारी, सोनवडी आदी परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱयांनी आपले गाऱहाणे मांडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आ. शिवेंद्रराजे यांनी मतदारसंघात झालेल्या पीक नुकसानीची सविस्तर माहिती दरेकर याना दिली. तसेच आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आणि शेतकऱयांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. कोरोना महामारीत फक्त शेतकऱयांमुळे सर्वांना खायला अन्नधान्य मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे, असे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले.  

  यावर ना. दरेकर म्हणाले की, शेतकऱयांची दयनीय अवस्था झाली आहे. ठाकरे सरकारने सरसकट प्रत्येक बाधीत शेतकऱयांना दहा ते 15 हजार रूपये तातडीची मदत द्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी रसत्यावर उतरेल. होणाऱया परिणामाला सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चितच परभणीत दिलेला शब्द पाळतील.  

अन्यथा राज्यभर आंदोलन उभारणार..

नुकसानग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार, बागायतसाठी 50 हजार व फळबाग लागवडीसाठी 1 लाख रूपये द्यावे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा राज्यभर भारतीय जनता पार्टी जनआंदोलन उभारेल, मग ते मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱयांनी आत्महत्या करू नयेत, नुकसानीने अधिक चिंताग्रस्त, निराश होवू नका, आम्ही तुम्हांला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही ना. दरेकर यांनी यावेळी दिली.

Related Stories

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’

pradnya p

मराठा आरक्षण रद्द; कोरोना संकटात मराठा समाजाने संयम बाळगावा : संभाजीराजे

Shankar_P

कोल्हापूर : शाहुवाडीत दिवसभरात १५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

triratna

सातारा : शहरातील पाणी गळती काढण्यासाठी उपनगराध्यक्षांचा पुढाकार

datta jadhav

विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांचा देशव्यापी निषेध दिन

Shankar_P

व्हॉटसअ‍ॅपवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल

triratna
error: Content is protected !!