तरुण भारत

केंद्रिय मंत्री आठवलेंनी पिकांच्या नुकसानीची पहाणी

प्रतिनिधी/ फलटण

बारामती येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पहाणी करुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी गोखळी (ता. फलटण) येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची पहाणी केली. गुरुवारी दुपारी अडीच वाजता गोखळी येथे आगमन झाले. गोखळी येथील गट नंबर 420 मधील सौ. सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची शेतावर जावून पहाणी केली. यावेळी आठवले म्हणाले, शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना मदत मिळालीच पाहिजे.

Advertisements

  फलटण विधानसभा संपर्क प्रमुख पै. बजरंग गावडे यांनी फलटण तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असल्याचे आठवले यांना सविस्तर माहिती दिली.  गोखळी, खटकेवस्ती येथील दौरा आटोपून मंत्री आठवले यांचे दुपारी तीन वाजता पंढरपूर प्रयाण झाले. मंत्री रामदास आठवले यांचे सातारा जिह्यात आगमन होताच  गोखळी निरानदीवरील पुलावर ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सौ. रंजना जाधव यांनी  फेटा, बुके, देवून स्वागत केले. भारतीय जनता पक्षाचे पै. बजरंग नाना गावडे, पिंटू जगताप, आरपीआय जिल्हा सचिव विजय येवले, तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, मुन्ना शेख, सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, राजू मारूडा वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, महिला आघाडीच्या विमलताई काकडे, मिनाताई काकडे यांनी मंत्री आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

खटकेवस्ती येथे पै. रामचंद्र गावडे, अक्षय गावडे यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार संजय यादव, विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सावंत, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडल कृषी अधिकारी भरत रणवरे, मंडलधिकारी महेंद्र देवकाते, पोलीस पाटील विकास शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

40 घरफोडय़ा करणारा डिलीव्हरी बॉय जेरबंद

Patil_p

गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील मंडलअधिकारी कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

खा. उदयनराजेंविरोधात अपशब्द वापरणाऱ्याला चोप

datta jadhav

”देशात अच्छे दिन आणणारे येताना महागाई घेऊन आले”

Abhijeet Shinde

जळगावात भीषण अपघातात 15 मजूर जागीच ठार

Rohan_P

सातारा जिल्हय़ात आजपासून हाफ लॉकडाऊन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!