तरुण भारत

‘या’ तीन देशांची हवा अत्यंत खराब : डोनाल्ड ट्रम्प

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

भारताविषयी नेहमी गोडवे गाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलावरून भारतासह तीन देशांवर टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. याउलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

Advertisements

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातील चर्चेची शेवटची फेरी आज संपली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या फेरीत हवामान बदलाच्या मुद्यावर भूमिका मांडताना भारतासह चीन आणि रशियावर टीका केली. हवामान बदलाच्या दिशेने भारताकडून केल्या जाणाऱ्या कामावर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीदेखील हवा प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्द्यांवर विरोधकांसोबतच भारत, रशिया आणि चीनवर टीका केली होती. 

ट्रम्प आणि बायडेन यांच्यातील आजचे चर्चासत्र जवळपास 90 मिनिटे चालले. मागील 35 वर्षाच्या तुलनेत आपल्या नेतृत्वात कार्बन उत्सर्जनाची स्थिती सर्वात चांगली आहे. तसेच आम्हाला अब्ज रुपये खर्च करायचे होते आणि आमच्याशी भेदभाव केला जात होता, म्हणून आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, असेही ट्रम्प म्हणाले.

Related Stories

टाळेबंदी हटविण्यास नकार

Patil_p

दिलासा : सोलापूर ग्रामीण भागात आज नवा रुग्ण नाही

triratna

मध्यप्रदेशात धार्मिक स्वातंत्र्य विधेयकाला मंजुरी

datta jadhav

चीनला धक्का देण्याच्या तयारीत ओली

Patil_p

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav

उत्तर प्रदेश : भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!