तरुण भारत

कोल्हापूर : पेठ वडगावचे कोविड सेंटर ३० ऑक्टोबरपासून बंद होणार

प्रतिनिधी / पेठ वडगाव

पेठ वडगाव शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे गेल्या महिनभरापूर्वी वडगाव व परिसरात सापडणाऱ्या कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी पालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी आला असल्याने वडगाव शहरातील कोविड सेंटरमधील अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी यांची सेवा समाप्त करण्याबाबत पंचायत समिती हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी यांनी पालिका प्रशासनास कळविले आहे. शहर व परिसरात कोरोना प्रादुर्भाव कमी आल्याने वडगाव शहरातील कोविड केअर सेंटर दि.३० ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी दिली. 

Advertisements

याबाबत बोलताना मुख्याधिकारी कोल्हे म्हणाल्या, जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, अध्यक्ष कोल्हापूर यांच्या आदेशानुसार कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी नागरी भागाकरीता वडगांव शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी अन्वये तसेच महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम २०२० मधील नियम १०-ए नुसार नागरी भागातील मुंबई नर्सिंग होम अॅक्ट १९४९ नुसार आरक्षीत केलेल्या धन्वंतरी आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज, पेठ वडगांव येथे वडगांव व पसिरातील नागरीकांचे करीता दिनांक ९ सप्टेबर पासून कोविड केअर सेंटर चालू करणेत आले होते.

सध्या वडगांव शहरामधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेने पॉझिटीव्ह रुग्णांचे आकडेवारी मध्ये घट होत असलेचे दिसून येत असलेने कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या पाहून आवश्यक कर्मचारी ठेवून अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी-मनुष्यबळ यांची सेवा समाप्त करण्याबाबत हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती  यांनी कळविले आहे.

सध्या शहरामध्ये व परिसरामध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी झालेने रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने दि.३० ऑक्टोबर पासून धन्वंतरी आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज, पेठ वडगांव, या ठिकाणी चालू करणेत आलेले कोविड केअर सेंटर बंद करणेत येणार आहे.
शहरामधील सर्व व्यापारी व नागरीकांनी आपली काळजी घेण्याच्या दृष्टीने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, हात साबनाने स्वच्छ धुवा,  पाण्याची वाफ दिवसातून तीन वेळा घ्यावी. अर्सेनिक अल्बम या औषधाचे डोस घ्यावे,  दुधामध्ये हळद टाकून उकळून दिवसातून तीन वेळ घ्यावी. ६० वर्षावरील व्यक्तीने घराबाहेर पडू नये व कोणाच्या संपर्कात येवू नये. तसेच आजारी व्यक्तीने कोणाच्या संपर्कात न येता स्वतंत्र राहून सर्वांनी आपण आपली स्वत:ची काळजी घ्यावी. नगरपरिषदेचे कर्मचारी व स्वयंसेवक आपल्या घरी माहीती घेण्यासाठी येत आहेत त्यांना आपली योग्य माहीती देवून सहकार्य करावे असे आवाहन वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी व मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी केले.

Related Stories

विधानपरिषदेची बारा नावे बाजूला काढायच ठरलयं – मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; पी.एन.- मुश्रीफ लवकरच बैठक

Abhijeet Shinde

चित्रपट कवी बापू घराळ काळाच्या पडद्याआड

Abhijeet Shinde

नोकरीच्या मागे न लागता मोठे उद्योजक बना

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिवडाव येथे टस्करचा मुक्काम वाढला

Abhijeet Shinde

चर्चा ‘कोरोना’ची, मृत्यू अन्य कारणाने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!