तरुण भारत

पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 92 हजार 85 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 28 हजार 731 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 17 हजार 608 रुग्णांपैकी 2 लाख 94 हजार 70 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 16 हजार 46 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.59  टक्के आहे. 

आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 68 हजार 636 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  4 लाख  92  हजार 85 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

महाराष्ट्रात यापुढे काँग्रेसच सत्तेत राहणार

Shankar_P

कल्याण-डोंबिवली मध्ये 24 तासात 131 कोरोनाबाधित रुग्ण

Rohan_P

ग्रामदैवत ‘कसबा’ गणपतीला फुलांची पोशाख पूजा

pradnya p

पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Shankar_P

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 105 नव्या रुग्णांची भर

Shankar_P
error: Content is protected !!