तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात 65 नवे रूग्ण, 75 कोरोनामुक्त, तर 4 मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65 नवे रूग्ण दिसून आले तर 75 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची एकूण संख्या 44 हजार 128 झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजार 708 झाली आहे. सध्या 1 हजार 959 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 425 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 125 जणांची ऍटीजेन टेस्ट केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अनील गवळी यांनी दिली.

Advertisements

जिल्ह्यात शुक्रवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 425 जणांची तपासणी झाली. सध्या 1 हजार 959 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 319 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 292 निगेटिव्ह तर 25 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 125 रिपोर्ट आले. जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये भादवण आजरा येथील 65 वर्षीय महिला आणि कोडोली पन्हाळा येथील 53 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला तर खासगी हॉस्पिटलमध्ये गोल्डन पार्क कलानगर सांगली येथील 60 वर्षीय महिला आणि भैरेवाडी पन्हाळा येथील 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 1 हजार 621 झाली आहे. कोरोनाने आजपर्यत ग्रामीण भागात 789, नगरपालिका क्षेत्रात 337 महापालिका क्षेत्रात 357 तर अन्य 138 जणांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासांत 75 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 44 हजार 128 झाली आहे. आजरा 2, भुदरगड 2, चंदगड 3, गडहिंग्लज 6, गगनबावडा 0, हातकणंगले 9, करवीर 4, पन्हाळा 2, राधानगरी 1, शाहूवाडी 1, शिरोळ 5, नगरपालिका क्षेत्रात 5, कोल्हापूर शहर 22 आणि अन्य 3 असे 65 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.

       आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 47 हजार 708
       आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 44 हजार 128
       सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 1 हजार 959
       आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1 हजार 621

Related Stories

प्रामाणिक कष्ट व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित : पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे

Abhijeet Shinde

सिनर्जी हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी, दोन तास लॅप्रोटॉमी शस्त्रक्रिया

Abhijeet Shinde

तासगावात 16 नवे रुग्ण, नगरपरिषद परिसरात कंटेन्मेंट झोन

Abhijeet Shinde

कुपवाड वादग्रस्त तलाठी किरण कवाळे निलंबित

Abhijeet Shinde

ॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा : अप्पर जिल्हाधिकारी कदम

Abhijeet Shinde

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!