तरुण भारत

मनपा आयुक्तांनी केली मतदान केंद्राची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

मतदार यादी आणि मतदान केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम महापालिका व निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधा आणि गैरसोयींची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी शुक्रवारी घेतली.

Advertisements

दरवर्षाला मतदार यादी आणि मतदान केंद्रांची तपासणी करण्यात येते. मतदार  यादीमधून मृत मतदारांची नावे कमी करणे, नवीन नावे दाखल करणे, चुकीची दुरूस्ती आदी सर्व कामे मतदार यादीत तपासणीवेळी करण्यात येतात. तसेच मतदान केंद्रांची पाहणी करून मतदान केंद्राच्या स्थितीचा आढावा घेण्यात येतो. काही मतदार केंदांची दुरूस्तीची कामे असतात. तसेच काही ठिकाणी बांधकाम करण्यात येते. अशावेळी मतदान केंद्र अन्यत्र स्थलांतर करावे लागते. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्मया, पाणी सुविधा, विद्युत पुरवठा व्यवस्थित आहे का? याची माहिती घेण्यात येते. त्यामुळे शुक्रवारी महापालिका आयुक्तांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन इमारतींची व अन्य सुविधांची पाहणी केली.

ज्या मतदान केंद्रांवर अपंगांसाठी रॅम्प नाही त्या ठिकाण रॅम्पची सुविधा करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे इमारतींच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱयांना विविध सूचना केल्या. यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी रवि मास्तीहोळीमठ, महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णावर व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते..

Related Stories

कबड्डी स्पर्धेत मुलीत वाळवा तर मुलात बेडकिहाळ संघ विजेता

Patil_p

स्मार्ट सिटीची कामे रखडली; रस्त्यांवर अडथळय़ांची शर्यत

Patil_p

घर पडून वर्ष झाले तरी कोणीच फिरकले नाही

Patil_p

मालमत्ता फेरसर्वेक्षणाचे काम रखडले

Patil_p

विनामास्क फिरणाऱयांकडून एक लाख रुपये दंड वसूल

Patil_p

स्वरमल्हारतर्फे आज संगीत बैठक

Omkar B
error: Content is protected !!