तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 13, 247 रुग्ण कोविडमुक्त!

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 13, 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 14 लाख 45 हजार 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 88.52 % आहे. 

Advertisements


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 7,347 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 32 हजार 544 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 43 हजार 922 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 184 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 43 हजार 015 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 84 लाख 79 हजार 155 नमुन्यांपैकी 16 लाख 32 हजार 544 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 35 हजार 245 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 13 हजार 545 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • शहरे   कोरोनामुक्त संख्या 
  • मुंबई :  2,20,6445
  • ठाणे :  1,88,761
  • पुणे :   2,94,990
  • पालघर : 37,403
  • सिंधुदुर्ग : 4,025

Related Stories

डॉ.विजय डोईफोडे, डॉ.श्याम शृंगारे यांना जीवनगौरव पुरस्कार

Rohan_P

सांगली : जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 4 लाख 37 हजार 984 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

ठाकरे सरकारचा मोठ निर्णय : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण होणार

Abhijeet Shinde

पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ ; चिक्की घोटाळा प्रकरणी अजून FIR का नाही? कोर्टाचा सवाल

Abhijeet Shinde

माढा तालुक्यात कोरोना बाधितांचा उच्चांक; तब्बल ५४ बाधितांची वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!