तरुण भारत

खादरवाडीत चैतन्यमय वातावरणात होतोय दुर्गामाता दौड

वार्ताहर/ किणये

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा खादरवाडी यांच्यावतीने गावात दुर्गामाता दौड मोठय़ा उत्साहात व चैतन्यमय वातावरणात सुरू आहे. अगदी मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोजची दौड सुरू आहे. गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडमुळे गावातील तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली असून तरुणांमध्ये एकात्मता टिकून राहण्यास ही दौड उपयोगी ठरत आहे.

Advertisements

गावातील सर्व देवदेवतांच्या मंदिरामधून शस्त्रांची पुजा अर्चा करून दौडला प्रारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, भारत माता की जय अशा घोषणानी खादरवाडी गाव दणाणून जातोय. गावातील गल्ल्यांमध्ये रोज महिला पहाटे लवकर उठून आकर्षक रांगोळय़ा घालीत आहेत. गल्लीतून येणाऱया दौडचे आरती ओवाळून स्वागत करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श व त्यांचे विचार तरुणांनी आचरणात आणणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकथेवर आधारित रोज तरुणांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रविवारी या दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे.

Related Stories

ग्राम पंचायत निवडणुकीत 781 जण बिनविरोध

Patil_p

धर्मवीर ज्वालेचे गावोगावी पूजन

Amit Kulkarni

महिलेचे सहा तोळय़ांचे दागिने लंपास

Patil_p

लग्नाला अडसर ठरणाऱया प्रेयसीचा खून

Amit Kulkarni

बेळगावच्या आणखी एका वकिलाची न्यायाधीशपदी नियुक्ती

Amit Kulkarni

लॉकडाऊनमुळे लोखंड सिमेंटचे दर वाढले

Patil_p
error: Content is protected !!