तरुण भारत

इंटरनेट मोफत; तरीही ‘या’ देशात एकही सायबर गुन्हा नाही

ऑनलाईन टीम / तालिन : 

उत्तर यूरोपमधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेल्या ‘एस्टोनिया’ या देशात मोफत इंटरनेट सेवा दिली जाते. तरीही या देशात आतापर्यंत एकाही सायबर गुन्ह्याची नोंद नाही. 

Advertisements

‘एस्टोनिया’ हा देश मोफत इंटरनेटसाठी जगप्रसिद्ध आहे. या देशातील सर्व लोक इंटरनेट साक्षर असल्याचे सांगण्यात येते. खरेदी-विक्री व्यवहार, कर भरणे तसेच इतर सेवांसाठी या देशातील नागरिक इंटरनेटचा वापर करतात. मात्र, अद्याप कोणीही इंटरनेटचा गैरवापर केला नाही. इंटरनेटच्या योग्य वापरासाठी या देशात कॅम्पेन राबवले जातात. विना लायसन्सच्या सर्व बेवसाईवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामळे या देशात एकही सायबर गुन्हा दाखल नाही.

एस्टोनियात मोफत इंटरनेट सेवेबरोबरच प्रवाशी वाहतूकही मोफत आहे. मोफत प्रवास सेवा देण्यासाठी या देशात जनमत घेण्यात आले होते. जनमताचा कौल पाहून ही सेवा सुरू करण्यात आली. ‘एस्टोनिया’ हा देश 1991 पर्यंत सोव्हिएत संघाचा एक भाग होता. सोव्हिएत संघातून बाहेर पडल्यावर या देशाने अल्पावधीतच आपल्या देशाची आर्थिक प्रगती साधली.

Related Stories

आयर्लंडचे पंतप्रधान रुग्ण सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात

prashant_c

पश्चिम आशियाई क्वाड’ची बैठक दुबईत

Patil_p

तिसऱयांदा आणीबाणी

Patil_p

रशिया, मेक्सिकोतही नवा संकरावतार

Patil_p

क्विंटन डी कॉकने या कारणासाठी सामना सोडला

Abhijeet Shinde

फिलिपिन्सच्या मिंडानाओमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

datta jadhav
error: Content is protected !!