तरुण भारत

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुढील वषी होण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना महामारीमुळे 2020 सालातील विविध राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांवर साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, चालू वषी होणारी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकली जाण्याची शक्मयता अखिल भारतीय रायफल संघटनेने वर्तविली आहे.

Advertisements

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा घेण्यासाठी राष्ट्रीय रायफल संघटनेने संलग्न असलेल्या विविध राज्यांच्या नेमबाजी संघटनांना कळविले आहे. 2020 वर्ष आता संपत आले असून शेवटच्या दोन महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा घेणे अवघड असल्याचे नेमबाजी संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये विविध राज्यांच्या नेमबाजी संघटनांना भरविण्यात येणाऱया राज्यस्तरीय स्पर्धांचा कार्यक्रम सादर करण्याची माहिती द्यावी, असे सुचविण्यात आले आहे. जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धा आणि कुमार सुरेंद्रसिंग नेमबाजी स्पर्धा रद्द करण्याचा विचार चालू आहे.

Related Stories

सौरभ गांगुलीवर नव्याने अँजिओप्लॅस्टी, प्रकृती ‘स्थिर’

Amit Kulkarni

नापोलीचा सलग पाचवा विजय

Patil_p

बेंगलोर एफसीचा स्पर्धेत पहिला विजय

Patil_p

आयपीएलमधील कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतले

Patil_p

भारत-बेलारुस महिलांची फुटबॉल लढत आज

Patil_p

पॅरा नेमबाज अवनी लेखराला रौप्यपदक

Patil_p
error: Content is protected !!