तरुण भारत

जेसॉन होल्डरसाठी ‘टर्निंग पॉईंट’

जेसॉन होल्डर हा असा खेळाडू, ज्याला आयपीएल खेळाडूंच्या लिलावात खरेदीदारच लाभला नव्हता. पण, यंदाचा हंगाम सुरु होण्यासाठी काही आठवडय़ांचा कालावधी बाकी असताना त्याला सनरायजर्स हैदराबाद संघाने पाचारण केले. हैदराबाद संघातील मिशेल मार्श दुखापतीने बाहेर फेकला गेल्यानंतर जेसॉन होल्डरला येथे संधी मिळाली.

अन्य खेळाडूंप्रमाणेच जेसॉन होल्डरला देखील संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाल्यानंतर क्वारन्टाईन कालावधी पूर्ण करावा लागला. पण, प्रत्यक्ष स्पर्धा सुरु झाल्यानंतर पहिल्या काही सामन्यात त्याला अंतिम संघात स्थानही मिळाले नाही. केवळ केन विल्यम्सन केकेआरविरुद्ध मागील लढतीत दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतरच होल्डरसाठी हैदराबाद संघाचे दरवाजे उघडले. हा त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट देखील ठरला.

Advertisements

होल्डर कसोटी क्रिकेटमध्ये विंडीज संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळतो. पण, वनडे व टी-20 या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात त्याला प्राधान्य दिले जात नाही. येथे मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात त्याने 33 धावात 3 बळी घेत आपण टी-20 क्रिकेटमध्येही भेदक गोलंदाजी करु शकतो, याची प्रचिती आणून दिली.

यंदा आयपीएल हंगामात राजस्थानविरुद्ध प्रथमच अंतिम संघात संधी मिळाल्यानंतर होल्डरकडे नवा चेंडू सोपवला गेला आणि या संधीचे त्याने पुरेपूर सोने केले. होल्डरने फॉलोथ्रूमध्ये उत्तम चमक दाखवली. शिवाय, एकदा यष्टीचा थेट वेधही घेतला. सॅमसनने नंतर होल्डरला मिडविकेटच्या दिशेने षटकारासाठी पिटाळून लावले व नंतर ऑफसाईडकडे पुढील चेंडू फटकावला. पण, वेगातील बदलाचे सावज ठरत तो पुढे त्रिफळाचीतही झाला. शेवटच्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आल्यानंतर त्याने डबल धमाका करत रियान पराग व स्टीव्ह स्मिथ यांचे बळी घेतले.

अंतिमतः त्याने 33 धावात 3 बळी असे पृथक्करण नोंदवले आणि यामुळे हैदराबादने प्रतिस्पर्धी राजस्थानला 20 षटकात 6 बाद 154 अशा माफक धावसंख्येवर रोखून धरले होते.

Related Stories

विंडीजचा आयसोलेशन कालावधी पूर्ण

Patil_p

स्पेनला नमवित भारताचा दुसरा विजय

Patil_p

अमीत खत्रीचा राष्ट्रीय विक्रम

Amit Kulkarni

स्वीडनच्या डय़ूप्लॅन्टिसला पॉल व्हॉल्टचे सुवर्ण

Patil_p

भारतीय तिरंदाजांची किमान तीन पदके निश्चित

Amit Kulkarni

कोल्हापूर : पै.लव्हाजी साळुंखेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

triratna
error: Content is protected !!